चायनीज बटाटा वडा | Chinese Potato Fritters. Recipe in Marathi

प्रेषक Priti Tara  |  18th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Chinese Potato Fritters. recipe in Marathi,चायनीज बटाटा वडा, Priti Tara
चायनीज बटाटा वडाby Priti Tara
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

2

0

About Chinese Potato Fritters. Recipe in Marathi

चायनीज बटाटा वडा recipe

चायनीज बटाटा वडा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chinese Potato Fritters. Recipe in Marathi )

 • ५-६ उकडून घेतलेले बटाटे
 • बारीक चिरलेला कोबी + ढोबळी मिरची १ वाटी
 • आलं + हिरवी मिरची + लसूण
 • हळद + गरम मसाला १-१चमचा
 • सोय + ग्रीन चिल्ली सॉस
 • कढीपत्ता व कोथिंबीर
 • हिंग व मोहरी
 • २ वाटी बेसन
 • मक्याच पिठ २-३ चमचे
 • खायचा कलर (शेंदरी)
 • चवीनूसार मीठ
 • खायचा सोडा चिमूटभर
 • फोडणी व तळण्यासाठी तेल .

चायनीज बटाटा वडा | How to make Chinese Potato Fritters. Recipe in Marathi

 1. उकडून घेतलेले बटाटे साल काढून घ्या आणि स्वच्छ धूतलेल्या हाताने ते बारीक करा. आलं + लसूण + हिरवी मिरची वाटा. ( खरतर खलबत्त्यामध्येच हे वाटाव ) कोबी आणि ढोबळी मिरची बारीक चिरून घ्या.
 2. कढईत ३-४ चमचे तेल घालून हिंग + मोहरी व कढीपत्ता ची फोडणी करा. त्यामध्ये आलं + लसूण + हिरवी मिरचीच वाटण घाला.
 3. त्यामध्ये 1 चमचा हळद व गरम मसाला + चवीनुसार मीठ घाला.
 4. सोय + ग्रीन चिल्ली साँस घाला. व्यवस्थित परतावे . आता कोबी + ढोबळी मिरची घालून परता आता बारीक केलेला बटाटा घाला आणि परतून घ्या. बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि एका ताटात ही भाजी स्वच्छ हाताने थोडी मिक्स करून पुन्हा कढईत टाकून परतून कढई उतरवा. भाजी थंड होऊ द्या.
 5. एका भांड्यात बेसन + मक्याच पिठ + खायचा कलर + खायचा सोडा + चवीनूसार मीठ व गरजेनुसार पाणी एकत्रित करून पिठ तयार करा.
 6. कढईत तेल तापवा . तयार भाजीचे गोळे हातावर घेऊन चपटे बनवून तयार पिठामध्ये घोळवून एक एक करून वडे कढईत सोडा. दोन्ही बाजूंनी वडे छान तळून घ्या. तयार वडे टोमॅटो सॉस किंवा सेझवान चटणी सोबत सर्व्ह करा.

Reviews for Chinese Potato Fritters. Recipe in Marathi (0)