गव्हाच्या पिठाची चाट कटोरी | Gavyachya pithachi chat katori Recipe in Marathi

प्रेषक Lata Vilaspure  |  19th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Gavyachya pithachi chat katori recipe in Marathi,गव्हाच्या पिठाची चाट कटोरी, Lata Vilaspure
गव्हाच्या पिठाची चाट कटोरीby Lata Vilaspure
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

6

0

गव्हाच्या पिठाची चाट कटोरी recipe

गव्हाच्या पिठाची चाट कटोरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Gavyachya pithachi chat katori Recipe in Marathi )

 • गव्हाचे पीठ 1वाटी
 • काॅर्न फ्लाॅवर 1चमचा
 • जिरे 1/2चमचा
 • ओवा 1/2चमचा
 • तेल 1 चमचा
 • मीठ चवीनुसार
 • मोड आलेली मटकी 4चमचे
 • भिजवलेले शेंगदाणे 2चमचे
 • भिजवलेले हरभरे2चमचे
 • मोड आलेले मूग 2चमचे
 • बारीक कापलेला कांदा 4 चमचे
 • चाट मसाला 2चमचे
 • बारीक कापलेली कोथिंबीर 2चमचे
 • तळण्यासाठी तेल
 • बारीक शेव 4चमचे

गव्हाच्या पिठाची चाट कटोरी | How to make Gavyachya pithachi chat katori Recipe in Marathi

 1. पीठात ओवा जिरे मीठ तेल घालून पीठ मळून घ्या (घट्ट)10मिनिटे ठेवा.
 2. त्याच्या छोट्या छोट्या पातळ पुरी लाटून घ्या.
 3. वाट्याच्या बूडाला तेल लावून पुरी चिटकाऊन घ्या. मग कढईत तेल गरम करून त्या वाट्या कढईत सोडा चिमट्याने वाट्या काढून घ्या .पिठाच्या वाट्या बारीक गॅसवर कुरकुरीत तळून घ्या.एका ताटात काढुन घ्या.
 4. दुसर्या कढईत दोन चमचे तेल गरम करून त्यात सगळे कडधान्ये टाकून 5 मिनिटे वाफवून घ्या.
 5. गार झाल्यावर कटोरीत लागेल तेवढं भरा. वरून कच्चा कांदा. चाट मसाला बारीक शेव कच्ची कोथिंबीर टाका

My Tip:

आवडत असेल तर तूम्ही त्यावर हिरवी चटणी किंवा सॉस टाकू शकता

Reviews for Gavyachya pithachi chat katori Recipe in Marathi (0)