मुख्यपृष्ठ / पाककृती / वडा पाव

Photo of Potato Fritters with Bread by Priti Tara at BetterButter
566
3
0(0)
0

वडा पाव

Jun-20-2018
Priti Tara
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वडा पाव कृती बद्दल

मला स्वतःला तळलेले पदार्थ खूप आवडतात. मी खूप experiments करत असते खास करून तळलेल्या पदार्थांमध्ये. फ्राय हा प्रकारच फार आवडीचा आहे माझा . त्यामध्ये वडा पाव तर दिलोदिमागमध्ये बसलेल आहे.मुंबई स्पेशल वडा पाव अशी ओळख याची आता महाराष्ट्राबाहेरही पोहचली आहे. वडा पाव साठी इंग्रजी मध्ये potato fritters अस म्हंटल जात. मी या ठिकाणी २ वेगळे फोटो अपलोड केले आहेत ते यासाठी की त्याच भाजीपासून मी ब्रेड पॅटिस ही बनविले आहेत.त्याचबरोबर आणखी काय बनवू शकतो त्यासंदर्भातही मी स्टेप्स मध्ये शेवटी नमूद केल आहे,

रेसपी टैग

 • सोपी
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • फ्रायिंग
 • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 6

 1. ५-६ उकडलेले बटाटे
 2.  लसूण चा १अख्खा कांदा + १/दीड इंच आलं + ६-७ हिरवी  मिरची 
 3. कोथिंबीर बारीक चिरून अर्धी वाटी
 4. ६-७  कढीपत्ता पाने
 5. १  टीस्पून मोहरी
 6. १/४ टीस्पून हिंग
 7. १/दीड टीस्पून गरम मसाला
 8. १ /दीड टीस्पून हळद
 9. फोडणीसाठी तेल ४-५ चमचे
 10. मीठ चवीप्रमाणे
 11. लादी पाव ,
 12. वड्याच्या कव्हरसाठी-
 13. २ वाटी बेसन
 14. पाणी आवश्यकतेनुसार
 15. मीठ चवीप्रमाणे
 16. १/४ टीस्पून हळद (ऐच्छिक आह.. मी हळद वापरत नाही.)

सूचना

 1. उकडलेले बटाटे सोलून हाताने कुस्करून घ्या. 
 2. आलं-लसूण आणि हिरव्या मिरची खलबत्त्या मधून वाटून घ्या.
 3. कढईत फोडणी साठी तेल गरम करा. त्यामध्ये हिंग, मोहरी व कढीपत्त्याची फोडणी करा.
 4. त्यात आलं-लसूण आणि हिरव्या मिरचीच वाटण घाला. त्यामध्ये हळद , गरम मसाला व मीठ घालून परतावे .
 5. त्यानंतर त्यामध्ये कुस्करलेला बटाटा घालून व्यवस्थित एकजीव करून घ्या. वरून चिरलेली कोथिंबीर घाला व भाजी पुन्हा परता.
 6. भाजी एका ताटात काढून हाताने मिक्स करून पुन्हा कढईत घालून परता .
 7. तयार भाजी ताटात काढून घ्या, आणि त्याचे समान चपटे गोळे करा.
 8. वड्याच्या कव्हर साठी-   
 9. बेसन घ्या. त्यात मीठ आणि बेताचे पाणी घालून एकजीव करा.
 10. बॅटर जास्ती पात्तळ किंवा खूप जाड नको.चमच्याने वरून खाली टाकून बघा. तार यायला पाहिजे.
 11. लागल्यास आणखीन पाणी घाला. बॅटर मध्ये १ चमचा कडकडीत तेलाचे मोहन घाला म्हणजे कव्हर कुरकुरीत होईल.
 12. वडे तळण्यासाठी कढईत पुरेसे तेल घ्या. तेल तापले कि बॅटरमध्ये सारणाचा गोळा बुडवून तेलात सोडा.वडे सोडायच्या आधी बोटाने बॅटरचा छोटा थेंब तेलात टाका. तो लगेच तळून आला कि तेल तापले आहे असे समजावे. वडे छान गोल्डन ब्राऊन रंग येई पर्यंत मध्यम आचेवर तळून घ्या.
 13. तयार वडे किचन पेपर मध्ये काढून घ्या. पावामध्ये चिंचेची गोड चटणी आणि तिखट चटणी लावून किंवा टोमॅटो साँस, मिरचीची भरड तिखट चटणी किंवा पावाची तिखट सूकि चटणी व बेसन मधे तळलेल्या मिरच्यां बरोबर गरम गरम बटाटे वडे खायला द्या.
 14. मी २ फोटो पोस्ट केले आहेत. दोन्ही मीच बनविल्या आहेत. दुसऱ्या फोटो मधील त्याच भाजीपासून ब्रेड पॅटिस बनविले आहेत. भाजी ब्रेड मध्ये भरून ब्रेड पॅटिस ही बनवू शकतो.
 15. त्याचबरोबर त्या भाजीमध्ये मिरची पावडर व निंबूसाद किंवा आमचूर पावडर घालून मोठ्या मिरच्यांमध्ये ती भाजी भरून मिरची वडे ही तळून बनवू शकता.
 16. भाजी जर का उरली तर दुसऱ्या दिवशी नाश्त्यामध्ये त्या भाजीपासून आलू पराठे ही बनवू शकता.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर