दही वडा | Dahi wada Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  22nd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Dahi wada recipe in Marathi,दही वडा, Bharti Kharote
दही वडाby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  45

  मि.
 • किती जणांसाठी

  10

  माणसांसाठी

3

0

दही वडा recipe

दही वडा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dahi wada Recipe in Marathi )

 • एक वाटी सफेद उडदाची डाळ भिजवलेली
 • एक चमचा आल पेस्ट
 • 2 हिरव्या मिरच्या
 • चवीनुसार मीठ
 • कडकडीत तेलाचे मोहन
 • तळण्यासाठी तेल
 • अर्धीवाटी चिंचेची चटणी
 • दोन वाटी फेटून घेतलेले दही
 • दोन चमचा हिरवी चटणी
 • पाव चमचा लाल तिखट
 • पाव चमचा चाट मसाला
 • एक चमचा साखर

दही वडा | How to make Dahi wada Recipe in Marathi

 1. 4/5 तास उडिद डाळ भिजत घालावी..
 2. मिक्सर मध्ये हिरवी मिरची आणि डाळ ..पाणी न घालता वाटून घ्या. .
 3. वाटलेल्या मिश्रणात आल पेस्ट मीठ घाला आणि फेटून घ्या. ..
 4. पॅन मध्ये तेल तापत ठेवा.
 5. मिश्रणात तेलाचे मोहन घाला. .
 6. गोल गोल वडे करून तेलात सोडा
 7. मंद आचेवर खमंग वडे तळून घ्यावे. .
 8. एका वाडग्यात पाणी घालून तळलेले वडे 10 मी.त्यात भिजू द्यावे..
 9. तोपर्यंत दह्यात साखर आणि आल पेस्ट घालून फेटून घ्या. .
 10. आधीच भिजत ठेवलेली चिंचगुळ मिक्सर मधून वाटून घ्या. .
 11. आता त्यांत चवीनुसार मीठ घाला. .
 12. आता भिजवलेले वडे हाताने दाबून पाणी नितरून घ्या. .
 13. एका डीश मध्ये वडे ठेवा. .
 14. त्या वर दही पसरवा. वडे पूर्ण झाकले गेले पाहिजे. .
 15. आता चिंचेची चटणी घाला. .
 16. नंतर आधीच बनवून ठेवलेली हिरवी चटणी घाला. .
 17. लाल तिखट आणि चाट मसाला भूरभूरवा.
 18. आणि डीश सर्व्ह करा. ...

My Tip:

वडे तळून पाण्यात भिजत घालायचे. .त्या मुळे वडे साॅफट होतात. ..

Reviews for Dahi wada Recipe in Marathi (0)