आळुवडी | Allu vedi Recipe in Marathi

प्रेषक Chhaya Paradhi  |  22nd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Allu vedi recipe in Marathi,आळुवडी, Chhaya Paradhi
आळुवडीby Chhaya Paradhi
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  35

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

0

0

आळुवडी recipe

आळुवडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Allu vedi Recipe in Marathi )

 • आळुची पाने १४
 • बेसनपिठ २कप
 • तांदळाच पिठ १/२कप
 • तिळ २च
 • धनेजिरे पावडर२च
 • आल लसुण मिरची जिर पेस्ट २-३च
 • चिंच २-३च
 • गुळ ३च
 • तिखट १च
 • गरममसाला १च
 • मिठ चविनुसार

आळुवडी | How to make Allu vedi Recipe in Marathi

 1. आळुची पाने स्वच्छ धुवुन रुमालाने कोरडी करा
 2. चिंच कोमट पाण्यात भिजवा
 3. आल लसुण मिरची जिर वाटण करा
 4. आळुची पाने शिरा ठेचुन व काढुन टाका
 5. भांड्यात बेसनपिठ व तांदळाच पिठ घ्या
 6. तिळ धनेजिर पावडर टाका
 7. तिखट व गरममसाला टाका
 8. आल लसुन मिरची जिर पेस्ट टाका
 9. गुळ व चिंचेचा कोळ टाका
 10. मिठ व थोड पाणी टाकुन मध्यम पातळ करा
 11. आळुच्या पानांचा आकारानुसार क्रम लावा
 12. प्रत्येक पानाला बेसनाचे सारण लावा
 13. पानांचा रोल करा
 14. पानांचे रोल १/२तास वाफवुन घ्या
 15. रोल थंड झाल्यावर वड्या कापुन घ्या
 16. तवा गरम करुन कमी तेलात (शॉलो फ्राय ) करा
 17. गरम गरम आळुवड्या खाण्यासाठी तयार

My Tip:

बेसनपिठात तांदुळाचे पिठ घेतल्यामुळे वडी कुरकुरीत होते

Reviews for Allu vedi Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo