मुख्यपृष्ठ / पाककृती / मोरपंख निमकी

Photo of Morpankh Nimki by Deepa Gad at BetterButter
0
3
0(0)
0

मोरपंख निमकी

Jun-26-2018
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मोरपंख निमकी कृती बद्दल

लहान मुलांना डब्यात काहीतरी हटके द्यायचे असेल तर ही निमकी करून द्या, मग बघा मुलं कशी खुश होतील ते!

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • किड्स रेसिपीज
 • महाराष्ट्र
 • फ्रायिंग
 • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 3

 1. १ कप मैदा
 2. काळं मीठ चिमूटभर
 3. साधं मीठ पाव च
 4. लाल मिरची क्रश १/२ च
 5. ओवा पाव च
 6. तूप/ तेल ४ च
 7. आवश्यकतेनुसार पाणी
 8. तळण्यासाठी तेल

सूचना

 1. मैदा, काळं मीठ, साधं मीठ, लाल मिरची क्रश, ओवा, तूप किंवा तेल घालून हाताने चोळून घ्या
 2. मुठीत घेऊन दाबलं तर गोळा व्हायला पाहिजे
 3. नंतर थोडं थोडं पाणी घालून घट्ट मळा
 4. त्या पिठाचे २ भाग करून लाटून घ्या
 5. सुरीने कापून चौकोन करा
 6. त्याचे उभे तीन भाग कापा
 7. मध्ये एक आडवा भाग कापा म्हणजे त्याचे आयताकृती ६ भाग होतील
 8. प्रत्येकावर मैदा भुरभुरा व दुमडा आणि सुरीने किंवा शंकरपाळीच्या कटरने दुमडलेल्या खालच्या बाजूला लाईनमध्ये कापा
 9. दुमडलेली बाजू उघडा व तिरकस टोक पाणी लावून चिकटवा,
 10. बाकीच्या दोन टोकापैकी एक टोक पहिल्या चिकटवलेल्या भागावर गोल फिरवून दाबा
 11. शेवटचे टोकही एकत्र तिथेच फिरवून दाबा
 12. पलटी मारून पहा मोरपंखाचा आकार तयार होईल ( मी विडिओ काढला आहे पण इथे अगोदर काढलेला असल्यामुळे टाकता येत नाही)
 13. सर्व मोरपंख बनवून घ्या
 14. तेलात लालसर होईपर्यंत तळा
 15. मस्त खुसखुशीत मोरपंख निमकी तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर