मुख्यपृष्ठ / पाककृती / कुरूम कुरुम

Photo of Kurum Kurum by Smita Koshti at BetterButter
1580
4
0.0(0)
0

कुरूम कुरुम

Jun-29-2018
Smita Koshti
0 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कुरूम कुरुम कृती बद्दल

ह्या पदार्थांचे नाव जरी हटके वाटत असले तरीही पदार्थ मात्र अगदी साधा आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर पोळीचे तळलेले तुकडे... अन्न हे पूर्ण ब्रम्ह हे मनावर कोरणारी आपली संस्कृती. आणि आधीच्या काळात जवळ जवळ सगळेच बेताच्या परिस्थितीतील. मग अशा परिस्थितीत मुलांना काही तरी चटपटीत कुठून देणार? अशा वेळी मुलांच्या पोटाची व जीभेची भूक भागवण्यासाठी एका सुगरणीच्या डोक्यातील ही उपज. उरलेल्या पोळ्यांचे कुणी शेकून खाकरे बनवितात, कुणी गोड चुरमा, कुणी तिखट चुरमा, कुणी पाणचिकोल्या, असं बरंच काही... पण कुरूम कुरूमची सर कश्यालाच नाही. बाहेरचे unhealthy, महागडे कुरकुरीत खाण्यापेक्षा कुरूम कुरूम एकदम मस्त व स्वस्त. अगदी साधी सरळ आणि सोपी अशी ही पाककृती आहे. आम्ही लहान असताना ह्याच्या कुरकुरीत पणा मुळे ह्याला कुरूम कुरूम म्हणत .आणि ओघाने मुलंही कुरूम कुरूम म्हणतात. कुरूम कुरूमचा घास तोंडात घेताच त्याचा दाताखाली येणारा कुरकुर आवाज... श्वासासोबत भूक चाळविणारा तळनाचा सुगंध.. टोमॅटोची गोडचट व लिंबाची आंबट टिचकी... आणि कांदा मिरचीचा जिभेला मधेच मिळणारा चटका...आहाहा.. तोंडाला पाणी सुटले.. चला मग बघूयात कुरूम कुरूम...

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फ्रायिंग

साहित्य सर्विंग: 2

  1. 2 पोळ्या (उरलेल्या)
  2. तळनासाठी तेल
  3. चाट मसाला
  4. जीरे पूड
  5. मीठ चवीनुसार
  6. 1 छोटे टमाटे
  7. 1 छोटा कांदा
  8. 2 हिरव्या मिरच्या (तिखटपणा आवडी नुसार)
  9. थोडी कोथिंबीर
  10. लिंबू 1/2

सूचना

  1. पोळीचे थोडे लांबट तुकडे करावे.
  2. गरम तेलात मोठ्या आचेवर खरपूस तळून घ्यावे.
  3. तळलेल्या तुकड्यांवर चाट मसाला तीखट मीठ भुरभुरून चांगले मिक्स करा . कुरूम कुरूम तयार.
  4. टोमॅटो सॉस सोबत किंवा शेजवान चटणीसोबत छान लागतात.
  5. पण ह्याची खरी मजा घ्यायची तर ह्याला हाताने कुस्करून त्यात कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर सगळं छान बारीक चिरून घालायचं चाट मसाला ,जीरे पूड, मीठ, आणि लिंबाचा रस घालून चांगले मिक्स कराचे.
  6. आणि.... आणि काय...लगेच ताव मारायचा ना राव...

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर