स्टफड् दही वडा | Stuffed dahi-vada Recipe in Marathi

प्रेषक Susmita Tadwalkar  |  30th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Stuffed dahi-vada recipe in Marathi,स्टफड् दही वडा, Susmita Tadwalkar
स्टफड् दही वडाby Susmita Tadwalkar
 • तयारी साठी वेळ

  2

  1 /4तास
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

13

0

स्टफड् दही वडा recipe

स्टफड् दही वडा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Stuffed dahi-vada Recipe in Marathi )

 • एक वाटी ऊडीद डाळ
 • तळण्यासाठी तेल
 • मिठ चवीप्रमाणे
 • २ वाट्या दही
 • जिरा पावडर
 • स्टफिंग साठी--
 • २-३ हिरव्या मिरच्या
 • ८-१० काजू पाकळ्या
 • १/२ इंच आलं
 • मुठभर बेदाणे
 • कोथिम्बीर
 • ओल्या खोबर्याचा एक तुकडा

स्टफड् दही वडा | How to make Stuffed dahi-vada Recipe in Marathi

 1. ऊडीद डाळ धूवून २ तास भिजत घाला
 2. पाणी काढून टाका आणि बारिक वाटून घ्या
 3. थोडं मिठ घालून फेटून घ्या
 4. बेदाणे सोडून स्टफिंगचं सर्व साहित्य बारिक चिरुन घ्या
 5. आता बेदाणे घालून थोडं मिठ घालून मिसळून घ्या
 6. आता वाटलेल्या डाळीचा छोटा-सा गोळा घेऊन ओल्या कपड्यावर गोल थापा व त्यात स्टफिंग भरा
 7. कापडाची घडी‌ घालून करंजीचा आकार द्या
 8. थोडा पाण्याचा हात लावून वडा काढून घ्या व गरम तेलात तळून घ्या
 9. तेलातून काढून घ्या व पाण्यात टाका
 10. २ मिनिटांनी हलक्या हातानी दाबून पाणी काढून घ्या
 11. गार करून घ्या
 12. दही फेटून घ्या व वड्यावर घाला
 13. आवडत असल्यास चिंचेची चटणी, जिरा पावडर घालून थंड सर्व करा

My Tip:

डाळ वाटताना पाणि अगदी कमी घाला

Reviews for Stuffed dahi-vada Recipe in Marathi (0)