फुलवडी | Fulwadi Recipe in Marathi

प्रेषक Nayana Palav  |  1st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Fulwadi recipe in Marathi,फुलवडी, Nayana Palav
फुलवडीby Nayana Palav
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    8

    माणसांसाठी

6

0

फुलवडी recipe

फुलवडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Fulwadi Recipe in Marathi )

  • बेसन १ कप
  • अख्खे धणे १ टीस्पून
  • बडीशेप १ टीस्पून
  • ओवा १/२ टीस्पून
  • पांढरे तीळ १ टीस्पून
  • खायचा सोडा १/२ टीस्पून
  • दही १/२ कप
  • साखर २ टीस्पून
  • हळद १/४ टीस्पून
  • मिरची पावडर २ टीस्पून
  • मीठ चवीनुसार
  • तेल तळण्यासाठी

फुलवडी | How to make Fulwadi Recipe in Marathi

  1. एका वाडग्यात दही घ्या, त्यात सोडा, मीठ, मिरची पावडर, हळद, साखर घाला.
  2. नीट मिक्स करा.
  3. आता यात २ टेबलस्पून तेल घाला.
  4. बेसना च्या पीठात दह्याचे मिश्रण घाला.
  5. घट्ट पीठ मळून घ्या.
  6. हाताने या पीठाचे सिंलीडर आकाराचे रोल करुन घ्या.
  7. एका कढईत तेल गरम करून हे रेल तळून घ्या.
  8. थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरुन ठेवा.

Reviews for Fulwadi Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo