मुख्यपृष्ठ / पाककृती / चकली भाजणी पुरी विथ चक्का आणि व्हिप क्रीम

Photo of Chakli Bhajni puri with Hung curd and whipp cream dip by archana chaudhari at BetterButter
1511
1
0.0(0)
0

चकली भाजणी पुरी विथ चक्का आणि व्हिप क्रीम

Jul-03-2018
archana chaudhari
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चकली भाजणी पुरी विथ चक्का आणि व्हिप क्रीम कृती बद्दल

नेहमीच्या चकली भाजणीचा वेगळा प्रकार

रेसपी टैग

  • मध्यम
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 6

  1. खमंग चकली भाजणी पुरी साठी
  2. चकली भाजणी पीठ-4 वाटी तांदूळ,2 वाटी हरभरा डाळ,1 वाटी मूग डाळ,1 वाटी उडीद डाळ,1/2वाटी तूर डाळ,1 मूठ साबुदाणा,1 मूठ पोहे सगळे वेगवेगळे धुऊन वाळवून भाजून 1/2वाटी धणे टाकून पीठ बनवणे.
  3. चकली भाजणीचे पीठ 2 वाट्या
  4. पाणी 1 वाटी
  5. तिखट 1 चमचा
  6. तीळ 1 चमचा
  7. तेल 1 मोठा चमचा
  8. मीठ चवीनुसार
  9. तेल 2 मोठे चमचे वरून टाकण्यासाठी
  10. डीप साठी
  11. चक्का 1/2 वाटी
  12. व्हिप क्रीम (तयार) 1 वाटी
  13. तिखट 1/4 चमचा
  14. मीठ चवीनुसार
  15. गरम मसाला 1/4 चमचा

सूचना

  1. पुरीसाठी 1 वाटी पाण्याला उकळी आल्यावर तेल,तिखट,तीळ,मीठ टाका.
  2. त्यामध्ये चकली भाजणीचे पीठ टाका. गॅस बंद करून झाकून 10 मिनिटे ठेवा.
  3. 10 मिनिटानंतर मिश्रण चांगले मळून घ्या, पोळीच्या कणकेप्रमाणे भिजवा.
  4. आता छोटा उंडा घेऊन,त्याची छोटीशी पुरी बनवा.
  5. पुरीला काट्याने टोचे मारा.
  6. प्रत्येक पुरी अप्पम पात्रात ठेऊन तिला गोल आकार द्या.
  7. वरील कडा जर बाहेर आल्या असतील तर कापून घ्या.
  8. 1 मिनिट ठेवून काढून घ्या.
  9. आता सगळ्या पुऱ्या तेलात मध्यम आचेवर तळून घ्या.
  10. आता डीप बनवण्यासाठी ,बीटर ने व्हिपक्रीम,चक्का, तिखट,गरम मसाला,आणि मीठ एकत्र करा.
  11. डीप चे मिश्रण पायपिंग बॅग मध्ये भरा.
  12. खमंग भाजणी पुरी मध्ये वरील डीप पायपिंग बॅग ने टाका.
  13. कोथिंबीर आणि काळ्या तीळ ने सजवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर