ज्वारी पालकचे थालीपिठ | Jwari palak thalipith Recipe in Marathi

प्रेषक Teesha Vanikar  |  3rd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Jwari palak thalipith recipe in Marathi,ज्वारी पालकचे थालीपिठ, Teesha Vanikar
ज्वारी पालकचे थालीपिठby Teesha Vanikar
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

0

0

ज्वारी पालकचे थालीपिठ recipe

ज्वारी पालकचे थालीपिठ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Jwari palak thalipith Recipe in Marathi )

 • 2वाटी ज्वारीचे पिठ
 • 1वाटी गव्हाचे पिठ
 • 1/2 वाटी बेसन
 • 1वाटी बारीक कापलेला पालक
 • 2कांदे
 • 1चमचा कसुरी मेथी
 • 2चमचे धने पावडर
 • 1/2चमचा हळद
 • 4हिरव्या मिरच्या
 • 2चमचे लाल तिखट
 • मीठ चवीनुसार
 • तेल

ज्वारी पालकचे थालीपिठ | How to make Jwari palak thalipith Recipe in Marathi

 1. सर्व पिठं एकत्र केली
 2. त्यात कांदा,पालक व सर्व मसाले व मीठ घातले
 3. हाताने सर्व चांगले मिक्स करुन हळुहळु पाणी घातले
 4. पाणी घालुन थालीपिठाचे पिठ सैलसर भिजवले
 5. पिठाचे समान भाग केले
 6. नाँनस्टिक पँन गरम करायला ठेवले
 7. काँटनचा स्वच्छ रुमाल ओला करून पाटावर ठेवला
 8. त्यावर थालीपिठाचा गोळा घेऊन हाताने त्याला दाबुन गोल शेप दिला
 9. तयार थालीपिठाला बोटाने मध्यभागी व अजुबाजुला असे 5होल केले
 10. सावकाश रूमालाच्या कडा धरून नाँनस्टिक पँनवर उलटा करुन थालीपिठ घातले
 11. तयार थालीपिठाच्या होलामध्ये थोडं तेल घालुन झाकण ठेवले
 12. 2मी.नंतर थालीपिठाची दुसरी बाजु शेकुन घेतली
 13. ह्याप्रमाणे सर्व थालीपिठं बनवुन घेतले व साँससोबत सर्व्ह केले

My Tip:

पालक ऐवजी ईतर ही पालेभाज्या बारीक कापुन घालु शकतो.

Reviews for Jwari palak thalipith Recipe in Marathi (0)