निवगरी | Nivagari Recipe in Marathi

प्रेषक deepali oak  |  5th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Nivagari recipe in Marathi,निवगरी, deepali oak
निवगरीby deepali oak
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

निवगरी recipe

निवगरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Nivagari Recipe in Marathi )

 • दिड वाटी तांदुळाचे पीठ
 • अडीच वाटी पाणी
 • अर्धा ईंच आले
 • लसूण ५/६ पाकळी
 • मीरच्या ४/५
 • जीरे १ चमचा
 • कोथिंबीर मुठभर चीरून
 • तेल २/३ चमचे
 • पाणी ऊकडण्या साठी
 • मीठ चवीनुसार

निवगरी | How to make Nivagari Recipe in Marathi

 1. कढईत अडीच वाटी पाणी तापत ठेवा
 2. आले लसुण मीरची व जीरे ह्याची जाडसर ठेचा वाटुन घ्या
 3. आता पाणी ऊकळले कि त्यात एक लहान चमचा तेल व मीठ घाला
 4. आता वाटलेला ठेचा घाला
 5. तांदुळाची पीठी ह्या ऊकळत्या पाण्यात पसरवून छान मीक्स करून घ्या.
 6. वाफेवर जरा पीठ छान ऊकड होवू द्या व वरून कोथिंबीर घाला.
 7. आता ही ऊकड जरा गार होत आली कि तेल पाण्याच्या हाताने छान मळुन घ्या
 8. आता ह्या मळलेल्या ऊकडीतुन लहान गोळा घेऊन हवे ते आकार द्या
 9. मोदकपात्रात किंवा चाळणीवर ५/७ मीनीटे ऊकडुन घ्या
 10. हे नुसतेच किंवा कच्चा तेलात बुडऊन गार किंवा गरम खाऊ घाला

My Tip:

तांदूळाचे पीठ हे बासमती तांदुळाचे असेल तर चव अजूनी छान येते.

Reviews for Nivagari Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo