बीटरूट पुरी | Beetroot Puri Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  11th Jul 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Beetroot Puri recipe in Marathi,बीटरूट पुरी, Sujata Hande-Parab
बीटरूट पुरीby Sujata Hande-Parab
 • तयारी साठी वेळ

  25

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

1

बीटरूट पुरी recipe

बीटरूट पुरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Beetroot Puri Recipe in Marathi )

 • गहू पीठ - १ १/२ कप घट्ट
 • बीट रूट रस किंवा प्युरी - १/२ - ३/४ कप
 • जिरा - १/२ टेबलस्पून (जाडसर वाटून घेतलेला)
 • जाड दही - 1 टेबलस्पून
 • स्वादानुसार मीठ
 • तेल - 1 टेबलस्पून पीठ मळण्यासाठी + 2 कप तळण्यासाठी
 • पाणी- २-३ टेबलस्पून किंवा घट्ट पीठ मळण्यासाठी जर लागत असेल तरच वापरने. 

बीटरूट पुरी | How to make Beetroot Puri Recipe in Marathi

 1. बीट रूट धुऊन, बारीक तुकडे करून मिक्सर ला प्युरी किंवा वाटून घेणे. गाळून घेणे.
 2. एका पातेल्यात गव्हाचे पीठ, मीठ, तेल, वाटलेले जिरा, दही, आणि बीटरूट प्युरी घ्या. चांगले मिक्स करावे
 3. जर लागत असेल तरच थोडे थोडे पाणी हळूहळू टाकावे आणि पीठ कडक किंवा घट्ट मळून घ्यावे झाकण ठेवून 15-20 मिनिटे बाजूला ठेवावे.
 4. एका कढाईत तेल गरम करावे.
 5. कणिकचे थोडे भाग घ्या आणि बॉल करा.
 6. थोडे तेल पोळपाटाला लावून घ्यावे.
 7. एक गोल ठेवा, थोडे तेल लावून, सर्व बाजूंनी समान रीतीने रोल करा. ते थोडे जाड असावे.
 8. मध्यम कमी आचेवर सर्व बाजूनी सोनेरी ब्राउन होईपर्यंत आणि फुगेपर्यंत फ्राय करा.
 9. बटाटा ची भाजी किंवा चण्याच्या भाजी किंवा कोणत्याही कडी बरोबर गरम सर्व्ह करा.

My Tip:

पुरी साठी पीठ घट्ट मळावे.

Reviews for Beetroot Puri Recipe in Marathi (1)

Nayana Palav4 months ago

Wow
Reply
Sujata Hande-Parab
4 months ago
thank you dear.. :kissing_heart::kissing_heart: