साबुदाणा भाजून घ्यावा.
बटाटे शिजवून घ्यावे.
साबुदाणा गार झाला की त्याचे मिक्सर मध्ये पिठ करावे.
बटाटे गार झाले की mash करून घ्यावे,
त्यात साबुदाणा पीठ , मिरची पेस्ट , मीठ , जिरा पावडर घालावी.
अर्धी वाटी पाणी घालून गॅस वर शिजवून घ्यावे.
शिजवताना घोटत रहावे.
पळी ने घालता येईल इतपत मिश्रण असावे.
प्लास्टिक कागदावर पळीने गोल गोल असे मिश्रण घालावे , सांडगे घालतो तसे.
उन्हात वाळवून घ्यावे.
वाळल्यावर तळून घेऊन खावेत. साबुदाणा पिठाची पापडी तयार.
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा