मुख्यपृष्ठ / पाककृती / स्टफ्ड सातू धिरडे

Photo of STUFFED satu dhirde by Chayya Bari at BetterButter
0
6
0(0)
0

स्टफ्ड सातू धिरडे

Jul-12-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्टफ्ड सातू धिरडे कृती बद्दल

अतिशय पौष्टीक व चविष्ट रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. स्टफिंग साठी पालक 1 वाटी धुवून चिरलेला
  2. मेथी 1वाटी
  3. सिमला मिरची 1
  4. भिजवून वाफवलेले काबुली चने 1/2वाटी
  5. उकडून कुस्करलेला बटाटा 1
  6. कोथिंबीर 2 चमचे
  7. आले लसूण पेस्ट 1 /2चमचा
  8. तिखट 1/2चमचा
  9. गरम मसाला 1 चमचा
  10. जिरे 1/2चमचा
  11. तेल 1/4वाटी
  12. बटर 2 चमचे
  13. मीठ चवीनुसार
  14. हळद 1/2चमचा
  15. धिरडे बनवण्यासाठी
  16. सातूचे पीठ 1.5वाटी
  17. बेसन 2 चमचे
  18. मीठ चवीनुसार
  19. हळद 1/2चमचा

सूचना

  1. प्रथम stuffing ची तयारी केली
  2. धिरड्याच्या पिठात हळद ,मीठ 1चमचा तेल घालून सरसरीत भिजवून ठेवले
  3. तेल तापवून जिरे घातले आले लसूण पेस्ट परतली मग सिमला मिरची परतली मग तिखट ,हळद ,मीठ घातले मग मेथी,पालक,घालून 5 मिनिटे परतले व उकडलेले काबुली चने कुस्करून घातले, कुस्करलेला बटाटा घालून परतला टोमॅटो सॉस ,गरम मसाला व कोथिंबीर मिक्स करून उतरून घेतले
  4. आता नॉनस्टिक पॅन वर तेल घालून पिठाचे धिरडे पसरवले
  5. उलटून तेल सोडले
  6. दोन्ही बाजूने छान शेकल्यावर मध्ये stuffing ठेवले
  7. दोन्ही बाजूने धिरडे फोल्ड केले
  8. Stuffed धिरडे तयार सॉस,चटणी बरोबर सर्व्ह केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर