स्पाईसी सूपी स्पाईरल्स | Spicy soupy spirals Recipe in Marathi

प्रेषक Smita Koshti  |  12th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Spicy soupy spirals recipe in Marathi,स्पाईसी सूपी स्पाईरल्स, Smita Koshti
स्पाईसी सूपी स्पाईरल्सby Smita Koshti
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

About Spicy soupy spirals Recipe in Marathi

स्पाईसी सूपी स्पाईरल्स recipe

स्पाईसी सूपी स्पाईरल्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Spicy soupy spirals Recipe in Marathi )

 • 2 वाटी कणीक
 • 1 छोटा चमचा नागली पीठ
 • 1छोटा चमचा बेसन
 • 1 छोटा चमचा ज्वारीचे पीठ
 • 1/2 छोटा चमचा सोयाबीन पीठ
 • मीठ चवीनुसार
 • तेल फोडणी साठी
 • 3 चमचे तुर डाळ
 • 1 प्रत्येकी कच्चा टोमॅटो,पिकलेला टोमॅटो ,कांदा, बटाटा, शिमला, वांग
 • मुठभर आंबट चुक्याची भाजी
 • कोथिंबीर बारीक चिरून
 • 3 मिरच्या (तिखट नसलेल्या)
 • 1 प्रत्येकी चमचा शेंगदाणे व खोबऱ्याचे काप
 • 1 प्रत्येकी चमचा शेंगदाणे कूट व खोबरा कीस
 • 2 चमचे हिरवी मिरची, अद्रक, लसूण पेस्ट
 • कढीपत्ता पाने 2....4
 • 1 चमचा जिरे व मोहरी
 • हिंग चिमूटभर
 • 1/2 छोटा चमचा हळद

स्पाईसी सूपी स्पाईरल्स | How to make Spicy soupy spirals Recipe in Marathi

 1. सगळे पीठं एकत्र करून कणीक चांगली मळून घ्यावी.( मी थोडे सोयाबीन दाणे गहू दळतानाच टाकत असते.)
 2. कणकेचे छोटे गोळे घेऊन लांब लांब वळून घ्या. व चित्रात दाखवल्याप्रमाणे स्टीकला गुंडाळून घ्या. ( बाजारात लाकडी काड्या मिळतात 5...7 इंचापर्यंत, किंवा गोल आईसक्रीम काड्याही वापरू शकतो.)
 3. लगेच ह्या स्टीक उकळत्या पाण्यात सोडा 2..3 मिनिटांनी काढून थंड पाण्यात टाका ..स्पाईरल्स काडीवरून काढून घ्या. आपले स्पाईरल्स तयार..
 4. स्पाईरल तयार करण्याआधी सर्व भाज्या बारीक चिरून त्यात कांदा ,तुर डाळ ,शेंगदाणे, खोबरे काप, हिरव्या मिरच्या उभ्या चिरून हळद हे सर्व टाका व मऊ शिजवून घ्या. म्हणजे कुकर होईपर्यंत स्पाईरल तयार होणार.
 5. कुकर झाल्यानंतर सर्व मिश्रण हलके घोटून घ्या .
 6. फोडणी साठी तेल गरम करून त्यात मोहरी जिरे तडतडल्यावर त्यात हिंग, कढीपत्ता पाने ,व मिरची पेस्ट टाकून चांगले तळून घ्या. लगेच त्यात शेंगदाणे कूट, खोबरे कीस घालून चांगले परतून घ्या. लगेच त्यात घटलेले मिश्रण घालून मीठ टाकावे आणि उकळी आणावी.
 7. नंतर त्यात स्पाईरल टाकून पुन्हा उकळी आणावी. व कोथिंबीर बारीक चिरून घालायची .
 8. गरम गरम सर्व्ह करावे. आवडत असल्यास थोडा लिंबाचा रस व बारीक चिरलेला कांदा घालू शकता.

My Tip:

मुलांसाठी बनवताना मिरची जपून वापरणे. शक्यतो गरमच खाणे.

Reviews for Spicy soupy spirals Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo