BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / पाटवडी रस्सा

Photo of PATWADI Rassa/ Patodi Rassa by Shubha Salpekar Deshmukh at BetterButter
2
3
0(0)
0

पाटवडी रस्सा

Jul-14-2018
Shubha Salpekar Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पाटवडी रस्सा कृती बद्दल

आमच्या विदर्भातील अतिशय प्रसिद्ध झणझणीत रस्सा भाजी।

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 4

  1. पाटवडी साठी-
  2. 1 वाटी बेसन
  3. 1 टेबलस्पून तेल
  4. 1/2 टीस्पून हळद
  5. 1/2 टीस्पून लाल तिखट
  6. 1/4 टीस्पून ओवा
  7. 1/4 टीस्पून भाजलेले धणे
  8. कोथिंबीर
  9. ओला खोबरं
  10. मीठ
  11. रसश्या साठी-
  12. 2 कांदे
  13. 7-8 लसूण पाकळ्या
  14. 1" आलं
  15. 2 टेबल स्पून तेल
  16. 1 टेबल स्पून धणे
  17. 1 टेबलस्पून सुकं खोबरं
  18. 1 टेबल स्पून खसखस
  19. 1 तेजपान
  20. खडे गरम मसाले ( छोटी इलायची, मोठी इलायची, लवंग, गोल मिरी, दालचिनी, स्टार फुल, शाहजीर, जावित्री)
  21. 1/2 टीस्पून जिरं
  22. 2 हिरव्या मिरच्या
  23. फोडणी साठी-
  24. 2 टेबल स्पून तेल
  25. मोहरी
  26. जिरं
  27. हळद
  28. काश्मिरी लाल तिखट
  29. मीठ

सूचना

  1. सगळ्यात आधी बेसन पीठ, मीठ, ओवा, भाजलेले धणे, पाणी एकत्र करून, त्याला साधी फोडणी देऊन , शिजवून घ्यावे। घट्ट झाल्यावर ह्याला तेल लावलेल्या पाटावर पसरवून घ्यावे। थोडं थंड झाल्यावर वड्या काढून घ्याव्यात। वरून कोथिंबीर आणि खोबरं घालावे।
  2. आता ग्रेव्ही साठी, कढईत तेल गरम करून घ्यावे। यात खडे मसाले, खसखस, धणे, कांदे, मिरच्या, लावून, आलं, जिरं, तेजपान, खोबरं घालून अगदी मंद आचेवर छान परतावे। मिश्रण थंड करून मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावे।
  3. कढईत तेल तापवून, जिरं, मोहरी, हिंग घालावे। यात बारीक केलेला मसाला घालून 5 मिनिटे परतून घ्यावा। हळद, काश्मिरी लाल तिखट आणि मीठ घालावे।आता पाणी घालून पातळ रस्सा करावा, उकळी आली की गॅस बंद करावे।
  4. पाटवड्या या रसश्यात घालून, कोथिंबीर टाकून, गरम गरम फुलके किंव्हा भाकरी सोबत सर्व्ह करावे।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर