शेपूचे मुटके | Shepu Cutlet Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  15th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Shepu Cutlet recipe in Marathi,शेपूचे मुटके, Bharti Kharote
शेपूचे मुटकेby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  40

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

2

0

शेपूचे मुटके recipe

शेपूचे मुटके बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Shepu Cutlet Recipe in Marathi )

 • एक वाटी ज्वारीचे पीठ
 • एक वाटी बाजरीचे पीठ
 • दोन वाट्या बारीक चिरलेली शेपू
 • एक चमचा लाल तिखट
 • पाव चमचा हळद ओवा हिंग जीरे पूड धने पुड
 • चवीनुसार मीठ
 • पाणी आवश्यकतेनुसार
 • तेल

शेपूचे मुटके | How to make Shepu Cutlet Recipe in Marathi

 1. एका वाडग्यात चिरून स्वच्छ धुतलेली शेपू घ्या. .
 2. त्यात दोन्ही पीठ घालून लाल तिखट हळद मीठ जीरे पूड धने पुड हिंग ओवा घालून चांगल मिक्स करून घ्या. .
 3. पाणी घालून पीठाचा गोळा बनवा. .
 4. हाताने मुटके बनवून घ्या. ..
 5. पॅन मध्ये तेल टाकून थोडं पाणी घाला..
 6. पाण्याला ऊकळी आल्या वर त्यात हळूहळू मुटके सोडा. .
 7. असेच सर्व मुटके सोडा. ..
 8. आता झाकण ठेवा. .मंद आचे वर 15 मी..वाफवून घ्या. ..
 9. आता झाकण ऊघडून बघा. ..मस्त कलर आलाय. .सर्व मुटके उलटे करून घ्या. ..
 10. परत 10 मी..वाफवत ठेवा. .
 11. आणि वरून खोबरे खीस घालून गरम गरम सर्व्ह करा. ..

My Tip:

या पीठात कोथिंबीर घालून पण मुटके बनवता येतात. ..

Reviews for Shepu Cutlet Recipe in Marathi (0)