पफ स्टाईल मसला गाकर | Puff Style Masala Gakar Recipe in Marathi

प्रेषक Vaishali Joshi  |  15th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Puff Style Masala Gakar recipe in Marathi,पफ स्टाईल मसला गाकर, Vaishali Joshi
पफ स्टाईल मसला गाकरby Vaishali Joshi
 • तयारी साठी वेळ

  45

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

पफ स्टाईल मसला गाकर recipe

पफ स्टाईल मसला गाकर बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Puff Style Masala Gakar Recipe in Marathi )

 • मल्टीग्रेन आटा १ कप( ५ किलो गहू +२ वाटी जव + २ वाटी सोयाबीन +१ वाटी चणे + २ वाटी ज्वारी + १ वाटी जवस मिक्स अस सगळ मिक्स करुन गिरणी तून दळून घेते )
 • मैदा १/४ कप
 • बटर लागेल तेवढ
 • मीठ थोडस
 • लसूण पाकळ्य़ा १०-१२ किस्लेल्या
 • चिली फ्लेक्स
 • ऑरेगैनो
 • चाट मसाला

पफ स्टाईल मसला गाकर | How to make Puff Style Masala Gakar Recipe in Marathi

 1. मल्टीग्रेन आटा घेउन त्यात बटर मैदा आणि थोडस मीठ टाकुन पीठ भिजवून तेलाचा हाथ लावून भांड्यात झाकून फ्रिज मधे १० मिनिट ठेउन द्या
 2. १० मिनिटा नंतर बाहेर काढून पुन्हा मळून घ्या आणि त्याची लांबट पोळी लाटून त्याला बटर लावा . पोळी ला आजू बाजूने एका वर एक फोल्ड करा आणि फिजर मधे १० मिनिट ठेवा
 3. बाहेर काढून पुन्हा त्याला लांबट लाटून घ्या परत बटर ची लेअर लावून घ्या , पहिले सारखेच फोल्ड करून पुन्हा १० मिनिट फ्रीजर मधे ठेवा
 4. हीच कृति ३ वेळा करा
 5. बाहेर काढून या वेळेस मोठी पोळी लाटून घ्या त्याला ४ भागात कापा
 6. आता त्यावर पहिले बटर लावा त्यावर किसलेला लसूण पसरवा ,त्यावर मीठ ,चिली फ्लेकस , ओरिगानो ,चाट मसाला भुरभुरवा
 7. पहिले सारखेच फोल्ड करा आणि ३ साइड नि काटे चमच्याने आरे पाडून घ्या असे हे गाकर बनवून घ्या आणि तव्या वर शेकायला ठेवा
 8. सगळ्या बाजूने चांगले क्रिस्पी होउ द्या अशा प्रकारे हे पफ स्टाइल मसला गाकर तयार

Reviews for Puff Style Masala Gakar Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo