फोडशीची भजी | Fodashi Leaves Pakora Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  15th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Fodashi Leaves Pakora recipe in Marathi,फोडशीची भजी, Sujata Hande-Parab
फोडशीची भजीby Sujata Hande-Parab
 • तयारी साठी वेळ

  25

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

फोडशीची भजी recipe

फोडशीची भजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Fodashi Leaves Pakora Recipe in Marathi )

 • फोडशीची पाने – १ १/२ कप बारीक कापलेली
 • बेसन – १/२ -३/४ कप 
 • कांदा – १ मध्यम उभा पातळ चिरून घेतलेला 
 • लाल मिरची पावडर – १/२ टीस्पून 
 • गरम मसाला – 1 टीस्पून
 • हिंग - १/४ टीस्पून
 • जिरे १/२ टीस्पून
 • तेल तळण्यासाठी - २ कप
 • मीठ चवीनुसार 

फोडशीची भजी | How to make Fodashi Leaves Pakora Recipe in Marathi

 1. फोडशीची पाने आणि कांदा एका वाडग्यात घेऊन मीठ टाकावे. चांगले चुरून घेऊन झाकण करून १५-२० मिनिटांसाठी बाजूला ठेवावे. ह्याने भजीच्या मिश्रणाला पाणी सुटते. वेगळे पाणी टाकायची गरज लागत नाही.
 2. त्यात गरम मसाला, हिंग, लाल तिखट, जिरे टाकून व्यवस्तीत एकत्र करावे.
 3. हळू हळू बेसन टाकून एकजीव करून घ्यावे. जर बेसन आणखीन लागत असेल तर टाकावे.
 4. एका कढईत तेल तापवावे. आंच कमी मध्यम ठेवावी. हळू हळू भजीचे मिश्रण थोडे थोडे करून तेलात सोडावे. तेल खूप गरम नसावे. नाही तर भजी आतून कच्च्या आणि बाहेरून करपतील.
 5. सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत कमी - मध्यम ज्योती वर तळून घ्या.
 6. गरमा गरम टोमॅटो सौस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा.

Reviews for Fodashi Leaves Pakora Recipe in Marathi (0)