कोलंबी बिर्याणी विथ बोंबील फ्राय | Kolambi Biryani with Bombil fry Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  17th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Kolambi Biryani with Bombil fry recipe in Marathi,कोलंबी बिर्याणी विथ बोंबील फ्राय, Deepa Gad
कोलंबी बिर्याणी विथ बोंबील फ्रायby Deepa Gad
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  45

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

कोलंबी बिर्याणी विथ बोंबील फ्राय recipe

कोलंबी बिर्याणी विथ बोंबील फ्राय बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Kolambi Biryani with Bombil fry Recipe in Marathi )

 • कोलंबी सोललेली १ मोठी वाटी
 • बासमती तांदूळ २ वाट्या
 • कांदे ४
 • टोमॅटो २
 • मालवणी मसाला २ च
 • धनेजिरे पावडर १ च
 • हळद १/२ च
 • आलं लसूण पेस्ट १ च
 • कोथिंबीर १ वाटी
 • तळण्यासाठी १ कांदा मोठा
 • काजू आवडीनुसार
 • दालचिनी १ तुकडा
 • तेजपत्ता २
 • काळी मिरी १/२ च
 • हिरवी वेलची ३-४
 • कढीपत्ता ७-८ पाने
 • तेल ४ च

कोलंबी बिर्याणी विथ बोंबील फ्राय | How to make Kolambi Biryani with Bombil fry Recipe in Marathi

 1. कोलंबी साफ करून मीठ, तिखट, लिंबूरस, आलं लसुन पेस्ट लावून १५ मिनिटे मॅरीनेट करा
 2. बासमती तांदूळ धुवून घ्या
 3. कढईत ४ वाट्या पाणी गरम करून त्यात थोडे तेल, मिरी घालून तांदूळ घाला अर्धवट शिजवा गाळणीवर गाळून घ्या
 4. कांद्याचे तुकडे मिक्सरमधून पेस्ट करून घ्या त्यातच थोडी कोथिंबीर घालून फिरवा
 5. टोमॅटो वाफवून घ्या व त्याचीही पेस्ट करून घ्या
 6. कढईत तेल घेऊन त्यात उभा चिरलेला कांदा टाळून घ्या कुरकुरीत होईपर्यंत मग काढा, त्याच तेलात काजू टाळून घ्या व काढा
 7. त्याच कढईत किंवा कूकरमध्ये तेल घालून त्यात सर्व खडा मसाला, कढीपत्ता, कांद्याची पेस्ट घालून त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत शिजवा
 8. नंतर त्यात टोमॅटो पेस्ट, आलं लसूण पेस्ट घाला, सर्व मसाले घाला व तेल सुटेपर्यंत शिजवा
 9. मॅरीनेट केलेली कोलंबी घाला, कोलंबी शिजली की शिजवलेला भात घाला व अलगद ढवळा
 10. कढईखाली तवा ठेवा म्हणजे भट खाली लागणार नाही . झाकण ठेवून मंद गॅसवर१५ मिनिटे शिजवा
 11. तयार आहे कोलंबी बिर्याणी, सर्व्ह करताना वरून तळलेला कांदा व काजू घाला, कोथिंबीर पेरा,
 12. मी बिर्याणीबरोबर बोंबील फ्राय, भाकरी व कोलंबी मसालाही केला आहे

My Tip:

भात शिजवून तयार ठेवा म्हणजे लगेच बिर्याणी करताना वापरता येईल

Reviews for Kolambi Biryani with Bombil fry Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo