गाजर घावन | Carrot Ghavan Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  18th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Carrot Ghavan recipe in Marathi,गाजर घावन, Sujata Hande-Parab
गाजर घावनby Sujata Hande-Parab
 • तयारी साठी वेळ

  8

  1 /4तास
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

गाजर घावन recipe

गाजर घावन बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Carrot Ghavan Recipe in Marathi )

 • इडली किंवा डोसा तांदूळ - २ कप
 • मेथीचे दाणे - १ टेबलस्पून
 • किसलेला गाजर - ३/४ – १ कप
 • चवीनुसार मीठ
 • पाणी - 2-3 कप रात्रभर भिजवण्यासाठी , मिश्रणासाठी १ - ३/४ कप
 • तेल - 3-4 टेबलस्पून
 • सर्विंग - नारळाची चटणी, टोमॅटो चटनी, चहा, कॉफी

गाजर घावन | How to make Carrot Ghavan Recipe in Marathi

 1. तांदूळ आणि मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवा. सकाळी पाणी काढून टाका आणि मिक्सर ला बारीक वाटून घ्या. वाटताना ३/४ भाग किसलेला गाजर घाला.
 2. मीठ, राहिलेला १/४ भाग किसलेला गाजर आणि पाणी घालून चांगले ढवळून घ्या. मिश्रण फार जाड किंवा अतिशय पातळ असू नये.
 3. नॉनस्टीक पॅन वर तेल पसरवून घ्यावे. एका गोल चमच्याने बनवलेले तांदूळ गाजराचे मिश्रण
 4. व्यवस्तिथ गोलाकार रितीने पॅनवर पसरवून घ्या. 4-5 सेकंद पॅनवर ताट ठेवावे. प्लेट काढून घ्या आणि डोसा पॅनच्या कडा सोडू लागल्यावर परतून घ्या. वर थोडे तेल शिंपडा आणि दुसऱ्या बाजूने भाजून घ्या.
 5. नारळ चटणी किंवा मसालेदार टोमॅटो चटणीबरोबर किंवा चहा, कॉफी बरोबर सर्व्ह करा.

Reviews for Carrot Ghavan Recipe in Marathi (0)