BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / मिश्र डाळींचे घावन

Photo of Mix Split Lentil Ghavan by Sujata Hande-Parab at BetterButter
497
4
0(0)
0

मिश्र डाळींचे घावन

Jul-18-2018
Sujata Hande-Parab
480 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिश्र डाळींचे घावन कृती बद्दल

दक्षिण भारत, गोवा आणि महाराष्ट्र क्षेत्रामध्ये हि डिश बरीच लोकप्रिय आहे. मिश्र डाळी आणि तांदूळ रात्रभर पाण्यात भिजवून ठेवून सकाळी ते वाटून घेऊन, थोडे मीठ, मसाले टाकून हे घावन बनवले जाते. टोमॅटोच्या चटनी बरोबर अतिशय उत्तम लागते. हेलथी, पटकन होणारी अशी हि डिश कधीही खाल्ली तरी चालते. मुलांना किंवा मोठ्यांनाही डब्याला अतिशय चांगला पर्याय आहे. एखाद्या करी किंवा भाजी बरोबर सर्व्ह केली तरी चविष्ट लागते..

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • टिफिन रेसिपीज
 • महाराष्ट्र
 • पॅन फ्रायिंग
 • रोस्टिंग
 • व्हिस्कीन्ग
 • ब्लेंडींग
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

 1. मिश्र डाळी - 1 कप (रात्रभर भिजवून घेतलेले
 2. डोसा तांदूळ - ३-४ टेबलस्पून . (रात्रभर भिजलेले)
 3. हिरवी पेस्ट - बारीक चिरून कोथिंबीर - १/४ कप
 4. लसूण पाकळ्या - २
 5. धणेपूड - १/२ टिस्पून
 6. पाणी - १-२ कप रात्रभर भिजवण्यासाठी + ३/४ -१ कप 
 7. तेल - २ टेबलस्पून
 8. चवीनुसार मीठ. 

सूचना

 1. एका ब्लेंडर किंवा मिक्सरला कोथिंबीर, लसूण पाकळ्या बारीक वाटून घ्या.
 2. तांदूळ आणि मिश्र डाळी रात्रभर पाण्यात भिजवून घ्या.
 3. दुसऱ्या दिवशी मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या. मीठ, तयार हिरवी पेस्ट, कोथिंबीर पावडर घालावी.
 4. आवश्यकतेनुसार पाणी घालावे आणि मिश्रण बनवून घ्यावे. जास्त पातळ किंवा जाड नसावे.
 5. एका नॉनस्टीक पॅन मध्ये तेल पसरवून घ्यावे. टिशु पेपर ने किंवा स्वच्छ कपड्याने पॅन पुसून घ्यावे.
 6. एक खोलगट चमच्याने मिश्रण अलगद गोलाकार पसरवावे. मिश्रण टाकताना पातळच थराने टाकावे.
 7. 10-12 सेकंद एका प्लेटने झाकून ठेवा. प्लेट काढून घ्या आणि डोसा पॅनच्या कडा सोडू लागल्यावर परतून घ्या. वर थोडे तेल शिंपडा आणि दुसऱ्या बाजूने भाजून घ्या.
 8. सगळे डोसे असा प्रकारे बनवून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर