मुख्यपृष्ठ / पाककृती / रवा डोसा

Photo of Rava dosa by Rohini Rathi at BetterButter
1
6
0(0)
0

रवा डोसा

Jul-18-2018
Rohini Rathi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रवा डोसा कृती बद्दल

कमी वेळात बनणारा पदार्थ लहान मुलांना आवडणारा

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. एक कप रवा
  2. दोन टेबल्स्पून तांदूळ पीठ
  3. अर्धा कप दही
  4. अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर
  5. दोन हिरव्या मिरच्या
  6. मीठ चवीनुसार
  7. तेल डोसा भाजण्यासाठी

सूचना

  1. सर्वप्रथम बारीक चिरलेली कोथिंबीर हिरवी मिरची व दही मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे
  2. एका बाउल मध्ये रवा तांदळाचे पीठ व मीठ एकत्र करून घ्यावे
  3. एकत्र केलेल्या मिश्रणात दही व कोथिंबिरीचे मिश्रण घालून एकजीव करून घ्यावे
  4. नॉनस्टिक पॅन गरम करून तेल लावावे
  5. चमचा च्या साह्याने बेटर गरम तव्यावर टाकावे
  6. बेटर पसरवण्याची गरज नाही
  7. साईडने तेल सोडून डोसा गुलाबीसर रंग येईपर्यंत भाजून घ्यावा
  8. दोन्ही साईडने भाजून घ्यावा
  9. अशाप्रकारे तयार डोसा टोमॅटो केचप बरोबर सर्व्ह करावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर