तवा पुलाव( रेस्टॉरंट स्टाईल) | Tava pulav(restaurant style) Recipe in Marathi

प्रेषक Manasvi Pawar  |  18th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Tava pulav(restaurant style) recipe in Marathi,तवा पुलाव( रेस्टॉरंट स्टाईल), Manasvi Pawar
तवा पुलाव( रेस्टॉरंट स्टाईल)by Manasvi Pawar
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

1

0

तवा पुलाव( रेस्टॉरंट स्टाईल) recipe

तवा पुलाव( रेस्टॉरंट स्टाईल) बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Tava pulav(restaurant style) Recipe in Marathi )

 • दोन वाट्या बासमती तांदूळ
 • एक वाटी मटार
 • एक वाटी शिमला मिरची बारीक चिरून
 • दोन बटाटे उकडून
 • पावभाजी मसाला दोन-३ चमचे
 • हळद
 • एक चमचा जिरे
 • दोन कांदे बारीक चिरून
 • चार-पाच टोमॅटो बारीक चिरून
 • एक लिंबाचा रस
 • एक वाटी कोथिंबीर चिरून
 • मीठ चवीनुसार
 • तेल चार चमचा
 • लाल तिखट १/२ चमचा

तवा पुलाव( रेस्टॉरंट स्टाईल) | How to make Tava pulav(restaurant style) Recipe in Marathi

 1. तांदूळ धुवून शिजवून घेणे पाणी बेताचेच घालावे भात मोकळा झाला पाहिजे
 2. आता एका मोठ्या कढईत किंवा पातेल्यात तेल गरम करून त्यात जिरे आणि कांदा परतून घ्यावा
 3. मटार घालून एक वाफ येऊ द्यावी
 4. सिमला मिरची घालून एक वाफ काढावी
 5. टोमॅटो घालून व्यवस्थित शिजवावा हळद लाल तिखट घालावे
 6. आता पाव भाजी मसाला घालून बटाटे आणि मीठ घालून उकडलेला भात घालावा
 7. व्यवस्थित परतून लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून एक वाफ काढावी
 8. आपला तवा पुलाव लंचबाॅक्स साठी रेडी आहे

Reviews for Tava pulav(restaurant style) Recipe in Marathi (0)