चीझी ओमलेट सेन्डविच | Cheese masala omelet sandwich Recipe in Marathi

प्रेषक seema Nadkarni  |  18th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Cheese masala omelet sandwich recipe in Marathi,चीझी ओमलेट सेन्डविच, seema Nadkarni
चीझी ओमलेट सेन्डविचby seema Nadkarni
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

3

0

चीझी ओमलेट सेन्डविच recipe

चीझी ओमलेट सेन्डविच बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Cheese masala omelet sandwich Recipe in Marathi )

 • 1.पेकेट ब्राऊन ब्रेड
 • 1/2 कप बारीक चिरलेला कांदा
 • 1/2 कप बारीक चिरलेला टोमॅटो
 • 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
 • 1/2 चमचा लाल तिखट
 • 1/2 चमचा काळी मिरी पावडर
 • 1/4 चमचा हळद
 • चवी प्रमाणे मीठ
 • 1/2 कप मेयोनीज
 • 1/2 कप कोथिंबीर ची चटणी
 • बटर
 • 1/2 कप किसलेला चीज

चीझी ओमलेट सेन्डविच | How to make Cheese masala omelet sandwich Recipe in Marathi

 1. एका पेन मध्ये 2 चमचा तेल घालून, त्यात कांदा घालून ब्राऊन होईल तोपर्यंत परतून घ्या
 2. त्यात बारीक चिरलेला टोमॅटो आणि चिरलेला बारीक मिरची घालून परतून घ्यावे
 3. त्यात हळद, मीठ आणि लाल तिखट घालून एकत्र करावे.
 4. तेल सुटायला आले की गॅस बंद करावा.
 5. एका वाटीत एक अंड फोडून त्यात बनवलेले मसाला 1 चमचा घालून एकत्र करून घ्यावे
 6. ब्रेड वर बटर आणि चटणी लावून ठेवावे
 7. पेन मध्ये 1 चमचा तेल घालून फोडलेली अंडी चे मिश्रण घालून घ्या
 8. त्या वरती चीज टाकावे आणि 2 बटर आणि चटणी लावलेली ब्रेड ची स्लाइस चीज च्या वर ठेवावी.
 9. ब्रेड ला उलट करुन ओमलेट ब्रेड च्या मध्ये येईल असे परतावे.
 10. दोन्ही बाजूंनी बटर लावून भाजून घ्या.
 11. अश्या च प्रकारे सगळे सेन्डविच तैयार करा
 12. सेन्डविच चे दोन भाग कापून त्या वर काळी मिरी पावडर आणि चाट मसाला घालून घ्या

Reviews for Cheese masala omelet sandwich Recipe in Marathi (0)