भरलेली भेंडी | Stuffed okra Recipe in Marathi

प्रेषक Teju Auti  |  19th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Stuffed okra recipe in Marathi,भरलेली भेंडी, Teju Auti
भरलेली भेंडीby Teju Auti
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

भरलेली भेंडी recipe

भरलेली भेंडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Stuffed okra Recipe in Marathi )

 • १०-१२ भेंडी
 • ६-७ पाकळ्या लसूण
 • तेल (फोडणीसाठी) १ मोठा चमचा.
 • बेसन १ मोठा चमचा
 • शेंगदाण्याचे कुट २ मोठा चमचा
 • हिंग (चिमटीभर)
 • हळद १/२ छोटा चमचा
 • मिठ (चवीनुसार)
 • कांदा लसुण मसाला ,लाल मिरची पावडर २ छोटा चमचा
 • जिरे पावडर १चमचा

भरलेली भेंडी | How to make Stuffed okra Recipe in Marathi

 1. १०-१२ भेंडी धुवून, पुसून घ्यावीत. देठ आणि टोकं कापून टाकावीत व मधे उभी चीर द्यावी.
 2. लसूण ठेचून घ्यावी
 3. सगळे साहित्य एकत्र करुन मसाला तयार करुन घ्यावा.
 4. चीर दिलेल्या भेंड्यांमध्ये मसाला भरुन घ्यावा. शिल्लक मसाला भेंड्यांना बाहेरुन सुद्धा लावावा.
 5. तेलाची फोडणी करुन त्यात लसूण पाकळ्या घालाव्यात.
 6. त्यात भरलेली भेंडी नीट लावावीत. शिल्लक मसाला घालावा.
 7. झाकण ठेवून,मंद गॅसवर शिजवावीत.
 8. पाणी अजिबात घालू नये. थोडी शिजली की, झाकण काढून, पुन्हा थोडे तेल सोडून, खरपूस, चुरचुरीत होईपर्यंत हलवत राहावे.

My Tip:

भेंडी शिजत आल्यावर बाजूने थोडे तेल सोडावे व नीट परतून घ्यावी.भाजी चुरचुरीत होते.

Reviews for Stuffed okra Recipe in Marathi (0)