पाच प्रकारचे सॅन्डवीच | 5 types of sandwiches Recipe in Marathi

प्रेषक priya Asawa  |  20th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • 5 types of sandwiches recipe in Marathi,पाच प्रकारचे सॅन्डवीच, priya Asawa
पाच प्रकारचे सॅन्डवीचby priya Asawa
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

1

0

पाच प्रकारचे सॅन्डवीच recipe

पाच प्रकारचे सॅन्डवीच बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make 5 types of sandwiches Recipe in Marathi )

 • ## व्हेज सॅन्डवीच
 • ब्रेड
 • ग्रीन चटनी
 • टोमॅटो सॉस
 • काकडी चे स्लाइस
 • टोमॅटो चे स्लाइस
 • ### सन् सॅन्डवीच
 • ब्रेड
 • ग्रीन चटनी 2 चमचे
 • बटाटे उकडून किसुन घेतलेले 1 वाटी
 • शिमला मिर्ची बारीकी चिरलेली 1/2 वाटी
 • कांदा बारीक चिरलेला 1/2 वाटी
 • बारीक शेव 1/2 वाटी
 • मीठ चवीनुसार
 • ### पिझ्झा ब्रेड सॅन्डवीच
 • ब्रेड
 • रवा 15 मिनिट भिजवून घेतलेला 1 वाटी
 • बारीक चिरलेली शिमला मिर्ची 1/2 कप
 • बारीक चिरलेला कांदा 1/2 वाटी
 • बारीक चिरलेला टोमॅटो 1/2 वाटी
 • हिरवी मिरची पेस्ट 1 चमचा
 • चीज् किसुन घेतलेला 1 वाटी
 • मीठ चवीनुसार
 • ### चॉकलेट सॅन्डवीच
 • ब्रेड
 • कोको पावडर 2 चमचा
 • चॉकलेट साॅस 3 चमचे
 • केळी चे स्लाइस
 • मोठी चेरी
 • #### स्कायस्कैपर सॅन्डवीच
 • पांढरे ब्रेड
 • ब्राउन ब्रेड
 • ग्रीन चटनी
 • टोमॅटो सॉस
 • किसुन घेतलेला बटाटा व त्याच्यात पिवळा कलर, काळीमीरी पावडर व मीठ चवीनुसार नुसार घालून टिक्की तयार केलेली

पाच प्रकारचे सॅन्डवीच | How to make 5 types of sandwiches Recipe in Marathi

 1. ### व्हेज सॅन्डवीच
 2. 2 ब्रेड स्लाइस घ्या व दोन्ही ब्रेड ला टोमॅटो सॉस आणि ग्रीन चटणी लावून एका ब्रेड वर काकडी व टोमॅटो चे स्लाइस ठेवा व दुसरा ब्रेड त्याच्यावर ठेवून क्रास मध्ये कापुन घ्या
 3. व्हेज सॅन्डवीच तयार
 4. ### सन् सॅन्डवीच
 5. एका बाऊल मध्ये शिमला मिर्ची, कांदा, किसलेला बटाटा, ग्रीन चटणी व चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्या
 6. ब्रेड चे स्लाइस वाटीचा साह्याने गोल स्लाइस कापुन घ्या
 7. एका स्लाइस वर तयार केलेले सारण लावून त्याचावर दुसरा ब्रेड ठेवून नाॅन स्टिक पॅन वर तेल लावून सॅन्डवीच खरपूस भाजून घ्या
 8. भाजलेल्या सॅन्डवीच चे मध्ये भागातून कापुन घ्या व सगळ्या बाजूने बारीक शेव लावून घ्या
 9. सन् सॅन्डवीच तयार
 10. ### पिझ्झा सॅन्डवीच
 11. एका बाऊल मध्ये भिजवून घेतलेला रवा टाका त्याचात कांदा,शिमला मिर्ची, टोमॅटो, मिरची ची पेस्ट व चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्या
 12. एका ब्रेड वर तयार केलेले सारण लावून घ्या
 13. नाॅन स्टिक तव्यावर तेल लावून सारण लावलेली ब्रेड दोन्ही बाजूंनी भाजुन घ्या सारण लावलेल्या बाजुने चीज् टाकून 1 मिनीट मंद गॅसवर ठेवा
 14. पिझ्झा ब्रेड सॅन्डवीच तयार
 15. ### चाॅकलेट सॅन्डवीच
 16. एका बाऊल मध्ये चाॅकलेट साॅस व कोको पावडर घेऊन मिक्स करून घ्या
 17. एका ब्रेड स्लाइस वर लावून घ्या
 18. वरच्या साईड ने केळ्याचे स्लाइस व त्याच्यावर चेरीचे तूकडे ठेवून कान तयार करून घ्या
 19. मध्य भागी चेरी लावून नाक तयार करून घ्या
 20. खालच्या बाजूला केळीचे स्लाइस ठेवून तोंड तयार करून घ्या
 21. चाॅकलेट सॅन्डवीच तयार
 22. ### स्कायस्कैपर सॅन्डवीच मोठ्या वाटीने स्लाइस कापुन त्याला टोमॅटो सॉस लावून घ्या
 23. त्या पेक्षा थोड्या लहान वाटीने ब्राऊन ब्रेड चे स्लाइस कापुन त्याला ग्रीन चटणी लावून तो स्लाइस टोमॅटो साॅस लावलेल्या स्लाइस वर ठेवा
 24. क्रम नुसार स्लाइस कापुन घ्या
 25. त्याचावर पांढरे ब्रेड ठेवा व त्याच्यावर तयार केलेली बट्याट्याची टिक्की ठेवा
 26. त्याचावर पांढरे ब्रेड चे स्लाइस ठेवा परत त्याचावर ब्राऊन ब्रेड ठेवा व सर्वात लहान स्लाइस पांढरे ब्रेड वर उभा करा व त्याला लवंग लावून डोळे तयार करून घ्या
 27. स्कायस्कैपर सॅन्डवीच तयार

My Tip:

जे गरम सॅन्डवीच आहेत ते गार झाल्यावर च टिफिन मध्ये भरावेत

Reviews for 5 types of sandwiches Recipe in Marathi (0)