छोले राजमा मसाला व्हेज पुलाव | Chhole Rajma Pulao Recipe in Marathi

प्रेषक Shubha Salpekar Deshmukh  |  22nd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Chhole Rajma Pulao recipe in Marathi,छोले राजमा मसाला व्हेज पुलाव, Shubha Salpekar Deshmukh
छोले राजमा मसाला व्हेज पुलावby Shubha Salpekar Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

छोले राजमा मसाला व्हेज पुलाव recipe

छोले राजमा मसाला व्हेज पुलाव बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chhole Rajma Pulao Recipe in Marathi )

 • 2 वाटी बासमती तांदूळ
 • 3-4 टेबल स्पून तूप
 • तेल कांदा तळायला
 • खडे गरम मसाले ( जीरं, शाह जीरं, गोल मिरी, लवंग, विलायची, जावित्री, तेजपान, दालचिनी, स्टार फूल)
 • उकळलेले राजमा आणि छोले 2 वाटी
 • 1 वाटी पनीर चे तुकडे
 • 1 मोठा टमाटा
 • 5-6 लसूण पाकळ्या
 • 1" आलं
 • 1 मोठा कांदा
 • 1 टेबल स्पून चणा मसाला
 • 1/2 टेबल स्पून तिखट
 • मीठ चवीनुसार
 • बारीक चिरलेली कोथिंबीर
 • बारीक चिरलेला पुदिना

छोले राजमा मसाला व्हेज पुलाव | How to make Chhole Rajma Pulao Recipe in Marathi

 1. तांदूळ धुवून, 1/2 तास भिजत घालावे.
 2. छोले राजमा रात्र भर भिजत ठेवावे। आणि कुकर मध्ये शिजवून घ्यावे।
 3. टमाटा, लसूण, आलं मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावे।
 4. कांदा तळून घ्यावा।
 5. गाजर, मटार, मक्याचे दाणे उकळून घ्यावे।
 6. ताँदूळात अक्खे गरम मसाले, मीठ आणि थोडं तूप घालून शीजवून घ्यावे।
 7. कढईत तूप तापवायला ठेवावे, जिरं घालावे, बारीक केलेला मसाला घालावा। 3-4 मिनिटे परतावा।
 8. आता ह्यात उकळलेले छोले, राजमा, गाजर, मटार, मक्याचे दाणे, पनीर घालावे।
 9. वरून चणा मसाला आणि तिखट घालून परतावे।
 10. आता शिजलेला भात, मीठ, तळलेला कांदा, कोथिंबीर, पुदिना घालून मिक्स करावे।
 11. हा पुलाव नुसताच खायला खूप छान लागतो। पण सोबतिला केचप किंवा रायता पण देऊ शकता।

Reviews for Chhole Rajma Pulao Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती