पनीर मका कोफ्ता करी | Panir Kofta Kari Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  22nd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Panir Kofta Kari recipe in Marathi,पनीर मका कोफ्ता करी, Aarya Paradkar
पनीर मका कोफ्ता करीby Aarya Paradkar
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

पनीर मका कोफ्ता करी recipe

पनीर मका कोफ्ता करी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Panir Kofta Kari Recipe in Marathi )

 • 2 वाट्या मका कणीस दाणे
 • 3 उकडून सोलून कुसकरलेले बटाटे
 • पाव किलो पनीर
 • 4 चमचे आले लसुण मिरची पेस्ट
 • 2 चमचे धणे जिरे पावडर
 • 3 चमचे बेसन पीठ
 • मीठ चवीनुसार
 • 1 बारीक चिरलेला कांदा
 • तळण्यासाठी व फोडणीसाठी तेल

पनीर मका कोफ्ता करी | How to make Panir Kofta Kari Recipe in Marathi

 1. प्रथम मक्याच्या दाण्याची भरड वाटून घ्यावी
 2. त्यात उकडून सोलून कुसकरलेले बटाटे, निम्मे किसलेले पनीर, 2 चमचे आले लसूण मिरची पेस्ट बेसन पीठ घालून चांगले मिक्स करा
 3. त्यातून थोडे मिश्रण बाजुला काढणे
 4. व बाकीच्या मिश्रणाचे छोटे छोटे कोफ्ते / पकोडे तळुन घ्यावे
 5. कोफ्ते तळुन घ्यावे
 6. नंतर एका कढईत तेल गरम करून फोडणी करून त्यात कांदा घालून चांगले परतून घ्यावे व बाजुला काढलेले मिश्रण घालावे
 7. त्यात 2 चमचे आले लसूण मिरची पेस्ट घालून चांगले परतून घ्यावे,दही, चवीनुसार मीठ घालून आवश्यक तेवढे पाणी घालून चांगली उकळी आणावी
 8. राहिलेले निम्मे पनीरचे तुकडे करून त्यात घालून चांगले खळखळून उकळणे
 9. आयत्यावेळी तळलेले कोफ्ते घालणे
 10. गव्हाच्या पिठाच्या रोटी बरोबर सर्व्ह करणे
 11. कोफ्ता करी तयार

My Tip:

रात्री कोफ्ते सारन करून ठेवले किंवा तळुन ठेवले तर सकाळी करी केल्यास वेळ वाचतो. कोफ्ते चटणी व सॉस बरोबरही छान लागतात

Reviews for Panir Kofta Kari Recipe in Marathi (0)