गाजर. हलवा | Carrot halwa Recipe in Marathi

प्रेषक Teju Auti  |  22nd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Carrot halwa recipe in Marathi,गाजर. हलवा, Teju Auti
गाजर. हलवाby Teju Auti
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

गाजर. हलवा recipe

गाजर. हलवा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Carrot halwa Recipe in Marathi )

 • ४ कप गाजराचा कीस
 • ४ टेबलस्पून साजूक तूप
 • १/२ कप साखर
 • १/२ टीस्पून वेलचीपूड
 • २ टेबलस्पून बेदाणे
 • २ टेबलस्पून बदामाची कापं
 • १ कप दुध
 • १/४ कप + १ टेबलस्पून खवा
 • चिमटीभर मीठ

गाजर. हलवा | How to make Carrot halwa Recipe in Marathi

 1. नॉनस्टिक भांड्यात तूप गरम करा. आणि त्यात गाजराचा कीस घालून १०-१५ मिनिटे परतून घ्या. परतून किसाचे प्रमाण थोडे कमी झालेले दिसेल आणि त्याला चकाकी येईल.
 2. कीस चांगला शिजला आहे याची खात्री करून त्यात साखर घाला आणि चांगले एकत्र करा. ५-७ मिनिटे परता.
 3. त्यात वेलची पूड, बेदाणे आणि बदाम घाला. दुध घालून दुध आटे पर्यंत परता.
 4. वेगळ्या भांड्यात खवा घालून गुलाबी रंगावर परतून घ्या. त्याला किंचित तूप सुटेल. खवा परतलेल्या गाजराच्या किसात मिक्स करा.
 5. सगळा हलवा पुन्हा एकदा परतून घ्या. आणि गरम किंवा थंड आवडी प्रमाणे सर्व्ह करा.

Reviews for Carrot halwa Recipe in Marathi (0)