उपवासाचे घावन | Fasting dosa Recipe in Marathi

प्रेषक Teju Auti  |  23rd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Fasting dosa recipe in Marathi,उपवासाचे घावन, Teju Auti
उपवासाचे घावनby Teju Auti
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

उपवासाचे घावन recipe

उपवासाचे घावन बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Fasting dosa Recipe in Marathi )

 • १ वाटी वरी तांदूळ
 • १ वाटी साबुदाणे
 • २ हिरव्या मिरच्या
 • २ चमचे नारळाचा चव
 • २ चमचे दाण्याचे कूट
 • चवीपुरते मिठ
 • साजूक तूप

उपवासाचे घावन | How to make Fasting dosa Recipe in Marathi

 1. साबुदाणा आणि वरीतांदूळ एकत्र भिजवावे. पाण्याची पातळी साबुदाणा व वरीतांदूळ बुडून वरती २ इंच एवढी असावी. अशाप्रकारे दोन्ही ४-५ तास भिजवावे.
 2. दोन्ही व्यवस्थित भिजल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. वाटतानाच त्यात मिरची, खोबरे, दाण्याचा कूट, मीठ घालावे. आपण नेहमीच्या घावनाला जेवढे घट्ट भिजवतो तेवढेच घट्ट भिजवावे. म्हणजे त्या अंदाजाने मिक्सरमध्ये पाणी घालावे.
 3. नॉनस्टीक तव्याला तूप लावून घ्यावे. एक डाव मिश्रण पातळसर पसरवावे. कडेने एक चमचा तूप सोडावे. एक वाफ काढावी. एक बाजू शिजली कि दुसरी बाजू निट होवू द्यावी.
 4. गरम घावन तयार भाजी बरोबर दयावे

My Tip:

जिरे व कोथिंबीर चालत असल्यास टाकू शकता.

Reviews for Fasting dosa Recipe in Marathi (0)