तुरीची उसळ | Turichi usal Recipe in Marathi

प्रेषक Smita Koshti  |  23rd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Turichi usal recipe in Marathi,तुरीची उसळ, Smita Koshti
तुरीची उसळby Smita Koshti
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

तुरीची उसळ recipe

तुरीची उसळ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Turichi usal Recipe in Marathi )

 • 2 वाट्या भिजवलेले तुर दाणे
 • 2 मोठे कांदे बारीक चिरून
 • 1 बारीक चिरून टोमॅटो
 • 4..5 बारीक चिरून लसूण पाकळ्या
 • लाल तिखट आवडीनुसार कमी जास्त
 • 4..5 पाने कढीपत्ता
 • 1/2 चमचा धणे पूड
 • मीठ चवीनुसार
 • 1/4 चमचा हळद
 • 1/4 चमचा गरम मसाला
 • 1/2 चमचा जिरे
 • 1/2 चमचा मोहरी
 • चिमूटभर हिंग
 • कोथिंबीर बारीक चिरून

तुरीची उसळ | How to make Turichi usal Recipe in Marathi

 1. रात्रभर भिजत घातलेली तुर दाणे थोडे मीठ आणि हळद, पाणी घालून कुकरमध्ये दोन शिट्ट्या घ्या
 2. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी जिरे तडतडल्यावर त्यात कढीपत्ता, हिंग घालून कांदा परतून घ्या
 3. नंतर त्यात टोमॅटो टाकून चांगले परतून घ्या
 4. मग त्यात हळद, धणे पूड, तिखट, गरम मसाला घालून चांगले परतून घ्या.
 5. नंतर त्यात शिजवलेले तुर दाणे, व थोडे मीठ घालून चांगले परतून घ्या व एक वाफ आल्यावर त्यात कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
 6. उसळ तयार. डब्यात देताना जर पातळ देणे शक्य असेल तर तुर दाणे शिजवलेले पाणी वापरून रस्सा करू शकतो.
 7. ही उसळ अशीच छान लागते.. मिसळ सारखी बारीक चिरलेला कांदा टोमॅटो टाकून, बारीक शेव, दही, लिंबू रस टाकून.
 8. पण तुम्ही ही पोळी सोबत ही भाजी सारखी खाऊ शकता. अप्रतिम चव येते.

My Tip:

ओले हिरवे तुर देणेही वापरून बनवू शकतो पण ते दाणे न शिजवता उसळ अशीच करावी. मी कोरडी तुर वापरली आहे.

Reviews for Turichi usal Recipe in Marathi (0)