लबाड मोदक | Labad modak Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  23rd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Labad modak recipe in Marathi,लबाड मोदक, Aarya Paradkar
लबाड मोदकby Aarya Paradkar
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  40

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

10

0

लबाड मोदक recipe

लबाड मोदक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Labad modak Recipe in Marathi )

 • **मोदक सारणाचे साहित्य
 • 1 वाटी भिजवलेली चना डाळ
 • 4-5 हिरव्या मिरच्या
 • 7-8 लसूण पाकळ्या
 • 1/2 वाटी कोथिंबीर
 • 1 चमचा जिरे
 • चवीनुसार मीठ
 • ** मोदकाच्या पारीचे साहित्य
 • 3-4 वाट्या कणीक
 • 2 चमचे तिखट
 • 1/2 चमचा हळद चिमूटभर हिंग
 • 1 चमचा धणे जिरे पावडर
 • 1 चमचा भाजलेला ओवा
 • 2 चमचे तेल
 • ** सुक्या सारणाचे साहित्य
 • 1/2 भाजलेले खोबरे
 • 3 चमचे भाजलेली खसखस
 • 1/2 चमचा पिठी साखर
 • 1 चमचा गोडा मसाला
 • 4 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर
 • 1 चमचा लिंबाचा रस
 • चवीनुसार मीठ
 • ** फोडणी साहित्य
 • 1 वाटी बारीक चिरलेला कांदा
 • तेल
 • 1/2 चमचा हळद
 • चिमुटभर हिंग
 • 1 चमचा तिखट
 • पाव चमचा मीठ

लबाड मोदक | How to make Labad modak Recipe in Marathi

 1. प्रथम मोदकाच्या पारीचे साहित्य एकत्र करून कणीक भिजवून ठेवावी
 2. नंतर मोदकाच्या सारणाचे साहित्य एकत्र करून मिक्सरमधून भरड वाटून घ्यावी पाणी घालू नये
 3. नंतर सुक्या सारणाचे साहित्य एकत्र करून घेणे
 4. आता भिजवलेल्या कणकेच्या छोट्या पुर्‍या लाटून त्यात चण्याच्या डाळीचे सारण भरून मोदक तयार करून घेणे
 5. आता हे मोदक वाफवून घ्या
 6. वाफवलेल्या मोदकाच्या बुडाला (+) मधे काप द्या वांग्याला देतो त्याप्रमाणे
 7. आता या कापलेल्या मोदकात खोबरे, खसखसचे सारण भरून घ्या
 8. आता तेलाची फोडणी करून त्यात मोहरी हिंग हळद घालून ते तडतडल्यावर त्यात कांदा घालून चांगले परतून त्यात चवीप्रमाणे तिखट आणि मीठ घालून सारण भरलेले मोदक घालून चांगले परतून घ्यावे
 9. कोथिंबीर घालून सर्व्ह करावे

My Tip:

रोटी, पोळी, भाकरी किंवा भाताबरोबर खायला छान ,आदल्या दिवशी मोदक करून आयत्यावेळी फोडणी करून डबा घेऊन जाता येईल

Reviews for Labad modak Recipe in Marathi (0)