मल्टीग्रेन ब्रेड-जॅम रोल | Multigrain Bread-Jam Roll Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  24th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Multigrain Bread-Jam Roll recipe in Marathi,मल्टीग्रेन ब्रेड-जॅम रोल, Sujata Hande-Parab
मल्टीग्रेन ब्रेड-जॅम रोलby Sujata Hande-Parab
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

मल्टीग्रेन ब्रेड-जॅम रोल recipe

मल्टीग्रेन ब्रेड-जॅम रोल बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Multigrain Bread-Jam Roll Recipe in Marathi )

 • ब्रेडचे तुकडे - ४-६
 • बटर - १-२ टेबलस्पून 
 • जॅम - ३-४ टेबलस्पून 
 • सर्विंग साठी - सुका मेवा, फळांचे काप, चॉकोलेट सिरप, चेरी

मल्टीग्रेन ब्रेड-जॅम रोल | How to make Multigrain Bread-Jam Roll Recipe in Marathi

 1. ब्रेडच्या जाड कडा कापून घ्या.
 2. लाटण्याचा वापर करून अलगद थोड्या लाटून घ्या. जास्त दाबू नये ब्रेड तुटू शकतो.
 3. थोडे बटर व्यवस्तिथ सगळ्या बाजूनी अलगद लावून घ्या.
 4. जॅम एका वाडग्यात घेऊन चमच्याने एकदम नरम करून घ्या. तो ब्रेडवर सगळीकडे सामान पसरवून घ्या.
 5. एक प्लास्टिक रॅप किंवा क्लिंग रॅप घेऊन त्यावर जॅम लावलेला ब्रेड अलगद उचलून ठेवावा.
 6. एका बाजूने रोल थोडा रोल करून घ्यावा. प्लास्टिक रॅप च्या साहाय्याने व्यवस्थित घट्ट रोल करून घेऊन क्लिंग रॅप च्या दोन्ही बाजूनी गाठ मारून रेफ्रिजरेटोर मध्ये १० मिनिटांसाठी ठेवावे.
 7. नंतर रॅपर कडून टाकावा आणि ब्रेड रोल चॉकोलेट सिरप, फळे, सुका मेवा ह्याबरोबर सर्व्ह करावे.

Reviews for Multigrain Bread-Jam Roll Recipe in Marathi (0)