BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / भरवा करेला

Photo of Bharva Karela by Deepa Gad at BetterButter
0
4
0(0)
0

भरवा करेला

Jul-25-2018
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भरवा करेला कृती बद्दल

मोठ्यांबरोबरच छोट्यांनाही आवडेल अशी तिखट गोड आंबट अशी चवीची ही भरवा करेला रेसिपी आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. कारली पाव किलो
  2. कांदा मोठा १
  3. टोमॅटो १
  4. कांदा खोबऱ्याचे वाटण
  5. दाण्याचे कूट २ च
  6. मालवणी मसाला २-३ च
  7. आलं लसूण पेस्ट १ च
  8. मीठ
  9. चिंचगुळ कोळ २-३ च
  10. तेल
  11. कोथिंबीर

सूचना

  1. कारल्याचे २-३ तुकडे करून घ्या व ते पाणी आणि मीठ घालून कुकरमध्ये २-३ शिट्या करून घ्या
  2. कढईत तेल घालून त्यात चिरलेला कांदा व टोमॅटो मऊ होईपर्यंत परता
  3. नंतर त्यात आलं लसूण पेस्ट, मालवणी मसाला घालून तेल सुटेपर्यंत परता
  4. तोपर्यंत शिजवलेली कारली घेऊन त्यातील बिया चमच्याच्या टोकाने काढून टाका
  5. डिशमध्ये कांदा खोबऱ्याचे वाटण घेऊन त्यात दाण्याचे कूट, मालवणी मसाला, मीठ, चिंचगुळ पेस्ट १ च घालून मिक्स करा
  6. हे मिक्स केलेला वाटण कारल्यात भरून घ्या
  7. कढईत सोडा राहिलेलं वाटण व थोडं पाणी घालून झाकण ठेवून एक वाफ काढा
  8. चिंचगुळ पेस्ट राहिलेली घालून परत एकदा चांगली वाफ काढा
  9. शिजली की कोथिंबीर घालून टिफिनसाठी चपातीबरोबर द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर