पुरण पोळी | PURAN poli Recipe in Marathi

प्रेषक Minal Sardeshpande  |  25th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • PURAN poli recipe in Marathi,पुरण पोळी, Minal Sardeshpande
पुरण पोळीby Minal Sardeshpande
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  68

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

पुरण पोळी recipe

पुरण पोळी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make PURAN poli Recipe in Marathi )

 • एक वाटी चणा डाळ
 • एक वाटी गूळ
 • एक वाटी मैदा
 • अर्धी वाटी कणिक
 • एक वाटी तेल
 • एक टीस्पून जायफळ पावडर
 • तांदूळ पिठी

पुरण पोळी | How to make PURAN poli Recipe in Marathi

 1. चणाडाळ धुवून दुप्पट पाणी घालून शिजवून घ्यावी.
 2. चाळणीवर काढावी.
 3. डाळीत गूळ आणि चिमूटभर मीठ घालून पुरण करून घ्यावे. गरम असतानाच पुरण यंत्रातून काढावे.
 4. मैदा आणि कणिक मीठ आणि अर्धी वाटी तेल घालून सैलसर भिजवावे.
 5. वरून तेल घालून झाकून ठेवावे.
 6. पोळी करायला घेताना छोटी पिठाची गोळी घेऊन वाटीचा आकार द्यावा.
 7. पिठाच्या दुप्पट पुरणाचा गोळा घेऊन पीठाच्या गोळीत भरावा.
 8. तांदूळ पाठीवर पोळी लाटावी.
 9. तव तापत ठेवून भाजावी.
 10. दुसरी बाजू भाजताना पोळी कागदाच्या घडीवर घेऊन तव्यावर टाकावी.
 11. तयार पोळी दूध आणि तुपासोबत फस्त करावी.

Reviews for PURAN poli Recipe in Marathi (0)