शेपूचे धिरडे आणि चण्याची उसळ | Shepuche dhirade aani chanyachi usal Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  25th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Shepuche dhirade aani chanyachi usal recipe in Marathi,शेपूचे धिरडे आणि चण्याची उसळ, Pranali Deshmukh
शेपूचे धिरडे आणि चण्याची उसळby Pranali Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

1

0

शेपूचे धिरडे आणि चण्याची उसळ recipe

शेपूचे धिरडे आणि चण्याची उसळ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Shepuche dhirade aani chanyachi usal Recipe in Marathi )

 • शेपूची भाजी 1 कप चिरून
 • कणिक 1 कप
 • तांदूळ पीठ 2 tbs
 • हिरव्या मिरच्या 2
 • खोबरं 1 तुकडा छोटा
 • जिरे 1 tbs
 • साखर 1 tbs
 • लिंबाचा रस 1 tbs
 • काळे चणे 1 वाटी
 • कांदा धणेपूड आणि टमाटर पेस्ट 1/2 कप
 • अद्रक लसूण पेस्ट 1 tbs
 • तिखट 1 tbs
 • हळद 1/2 tbs
 • मीठ
 • गरम मसाला 1 tbs
 • तेल 2 tbs

शेपूचे धिरडे आणि चण्याची उसळ | How to make Shepuche dhirade aani chanyachi usal Recipe in Marathi

 1. शेपू ,खोबरं ,मिरच्या जिरे थोडं पाणी घालून मिक्सरला फिरवून घ्या
 2. एका बाऊलमध्ये कणिक तांदूळपिठ ,आणि मिक्सरला फिरवलेली शेपू मिक्स करा
 3. त्यामध्ये लिंबाचा रस साखर मीठ आणि पाणी घालून धिरड्याच्या पिठाप्रमाणे भिजवा .
 4. नॉनस्टिक तव्यावर जरा तेल सोडून हे बॅटर पळीने टाका .
 5. थोडा गोल आकार द्यायचा प्रयत्न करा.
 6. दोन्ही बाजूने तेल सोडून भाजून घ्या .
 7. शेपूचे धिरडे तयार तुम्ही नुसतं लोणचे किंवा चटणीबरोबर पण देऊ शकता .
 8. पण एखादी उसळ जर दिली तर आरोग्यासाठी लाभदायी राहील
 9. चणे रात्रभर पाण्यात भिजत घाला
 10. सकाळी पाणी झारुन घ्या
 11. कुकरमध्ये तेल टाकून कांदा टमाटर पेस्ट अद्रक लसूण पेस्ट परतवा
 12. तिखट हळद मीठ गरम मसाला घाला
 13. भिजलेले चणे घाला
 14. 1 ग्लास पाणी घालून तीन ते चार शिट्या काढा
 15. टिफिनमध्ये धिरडे आणि चणे त्यावर बारीक कांदा टमाटर घालून द्या .

My Tip:

शक्यतो टिफिनसाठी भाजीला लागणारा मसाला रात्रीच करून ठेवा आणि भाज्याही कापून ठेवा.झटपट टिफिन तयार करता येतो.

Reviews for Shepuche dhirade aani chanyachi usal Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo