मुख्यपृष्ठ / पाककृती / ब्रोकोली पराठा

Photo of Broccoli Paratha by Sujata Hande-Parab at BetterButter
882
4
0.0(0)
0

ब्रोकोली पराठा

Jul-25-2018
Sujata Hande-Parab
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ब्रोकोली पराठा कृती बद्दल

ब्रोकोली हि कोबी च्या जातीमधील एक हिरवी वनस्पती आहे आणि ती मोट्या प्रमाणावर खाल्ली जाते. ब्रोकोली हे नेहमी उकडून, वाफवून किंवा कच्चेच खाल्ले जाते. हि अनेक पाककृती मध्ये वापरली जाणारी निरोगी व पौष्टिक हिरवी भाजी आहे. या कृती मध्ये मी ब्रोकोली पराठे; ब्रोकोली, बटाटे, कांदा आणि काही मसाले वापरुन तयार केले आहेत . हा पराठा अतिशय स्वादिष्ट आणि खाताना तोंडात विरघरळतो. ब्रोकोली ला स्वतःचा असा एक फ्लेवर आहे जो ह्या डिश ला अतिशय उत्तम अशी चव देतो. टिफिन साठी, किंवा दुपारचे रात्रीचे जेवणासाठी एक चांगला पर्याय आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • नॉर्थ इंडियन
  • स्टर फ्रायिंग
  • रोस्टिंग
  • ब्लेंडींग
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. आवरणासाठी - गव्हाचे पीठ - १ कप
  2. तूप / तेल - १ टीस्पून + २ टीस्पून पराठा भाजण्यासाठी
  3. चवीनुसार मीठ
  4. तांदूळ पीठ किंवा गव्हाचे पीठ - १/४ कप पोळपाटाला आणि पराठ्याला लावण्यासाठी
  5. पीठ मळण्यासाठी पाणी
  6. सारणासाठी - ब्रोकोली फ्लोरेट्स - १ कप दाबून घेतलेले
  7. उकडलेले बटाटे - १ लहान (किसलेले)
  8. जिरे - १ टीस्पून
  9. कांदा - १ लहान किंवा मध्यम- एकदम बारीक चिरून
  10. लिंबाचा रस - १/२ टेबलस्पून किंवा अर्धा लिंबू
  11. गरम मसाला - १/२ टिस्पून
  12. हळद पावडर - १/२ टीस्पून + १/४ टीस्पून - ब्लांच करण्यासाठी 
  13. गरम पाणी - ब्लांचिंगसाठी २ कप
  14. चवीनुसार मीठ आणि ब्लांचिंगसाठी - १/२ टीस्पून 
  15. हिरवी पेस्ट - हिरव्या मिरच्या - ३-४
  16. लसूण पाकळ्या - ५-६
  17. किसलेले आले - १/२ टेबलस्पून

सूचना

  1. कणिकेसाठी - एका खोल कटोरी मध्ये किंवा परातीत गव्हाचे पीठ, तेल, मीठ घ्या. ते मिक्स करावे
  2. पुरेसे पाणी घालून चांगले मळून घ्यावे. झाकण ठेवून ३० मिनीटे बाजूला ठेवावे.
  3. भरण्यासाठी सारण - लसूण, हिरव्या मिरच्या, आले लसूण बारीक पेस्ट करून घ्यावी.
  4. एका भांड्यात पाणी ठेवून त्याला उकळी काढावी. त्यात हळद आणि मीठ टाकावे. ब्रोकोली च्या पाकळ्या टाकाव्यात. दांडे घेऊ नयेत. ३-४ मिनिटांसाठी चांगली उकळी येउ द्यावी आणि फ्लोरेट्स ला हि थोडे शिजू द्यावे. नंतर गॅस बंद करून पाणी पूर्णपणे काढून टाकावे किंवा गाळून घ्यावे.
  5. त्यात थंड पाणी घालावे आणि चांगले निथळू द्यावे. चांगले निथळल्यानंतर फूड प्रोसेसर किंवा मिक्सर वापरून थोडे जाडसर रवाळ करून घ्यावे.पेस्ट बनवू नका.
  6. एका नॉनस्टिक्स पॅन मध्ये तेल गरम करून त्यात जिरे घालावे. त्याला तडतडू द्या.
  7. बारीक चिरलेला कांदा घाला. पारदर्शक होईपर्यंत शिजवा.
  8. तयार हिरवी पेस्ट घाला. कच्चा सुगंध दूर होईपर्यंत शिजवा.
  9. तयार हिरवी पेस्ट घाला. कच्चा सुगंध दूर होईपर्यंत शिजवा.
  10. हळद, गरम मसाला, मीठ घालावे. काही सेकंद ढवळा.
  11. लिंबाचा रस घाला. चांगले मिक्स करावे ब्रोकोली चे मिश्रण घालावे. चांगले मसाले मिक्स होईपर्यंत ढवळावे.
  12. किसलेले बटाटे घालावे चांगले मिक्स करावे काही सेकंद ढवळावे.
  13. मळलेल्या कणकेचे 8- 9 समान भाग करावे. त्याचे गोळे करून घ्यावेत.
  14. गव्हाचे किंवा तांदळाचे पीठ पोळपाटाला आणि गोळ्यांना लावून त्याची ४-इंच लहान समान मध्ये जाड आणि बाजूनी पातळ अशी पोळी करून घ्या.
  15. त्यात १ १/२ टेबलस्पून ब्रोकोली-बटाटा मिश्रण भरा. सगळ्या किनारी एकत्र करून पिंच करा आणि एक बॉल तयार करा.
  16. थोडा दाबून फ्लॅट करून हळुवारपणे पराठा 6-7 "व्यासा मध्ये लाटून घ्या.
  17. नॉनस्टीक पॅन किंवा तव्यावर पराठा ठेवा. वर बुडबुडे दिसू लागताच तो परतून घ्या. मध्यम आचेवर भाजून घ्या.
  18. परत परतून घ्या आणि काही सेकंद शिजवा. थोडे तूप घालावे.
  19. पुन्हा परता आणि तूप लावून चांगला दोन्ही बाजूनी तपकिरी रंग खरपूस भाजून घ्या. पलिता वापरून सगळ्या बाजूनी दाबून घ्या.
  20. ताटात काढून दही, लोणचे किंवा कोणत्याही चटणी बरोबर गरमागरम सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर