कोबी मुठिया | Cabbage Muthia Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  25th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Cabbage Muthia recipe in Marathi,कोबी मुठिया, Sujata Hande-Parab
कोबी मुठियाby Sujata Hande-Parab
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

कोबी मुठिया recipe

कोबी मुठिया बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Cabbage Muthia Recipe in Marathi )

 • बेसन - १ कप किंवा १३ टेबलस्पून
 • गहू पीठ - ४ टेबलस्पून
 • कोबी - १ कप मिक्सर ला लावून रवाळ वाटून घेतलेला. पेस्ट नको (दाबून घेतलेला)
 • चिंचेची पेस्ट - १ टिस्पून
 • हिंग - १/२ टिस्पून
 • धणे पूड - १/२ टिस्पून
 • जिरेपूड - १/२ टिस्पून
 • हळद - १/२ टिस्पून
 • लाल तिखट - १ टिस्पून
 • किसलेला गूळ– १ टिस्पून
 • ताजे आले - १ टीस्पून जाडसर वाटलेले 
 • हिरवी मिरची - २ जाडसर वाटलेले 
 • लसूण पाकळ्या - ३ जाडसर वाटलेले 
 • चवीनुसार मीठ
 • तेल - तळण्यासाठी १-२ टेबलस्पून + २ टीस्पून फोडणी
 • पाणी - १/२ -१ टेबलस्पून (थोडे थोडे वापरावे) 
 • फोडणीसाठी - कढीपत्ता पाने - ३-४
 • तीळ सफेद - १/२ टेबलस्पून 
 • जिरे - १/२ टेबलस्पून 
 • हिंग - १/४ टीस्पून

कोबी मुठिया | How to make Cabbage Muthia Recipe in Marathi

 1. एका वाडग्यात बेसन, गव्हाचे पीठ, जीरे, धणे पूड, लाल मिरची पूड, हिंग, तेल, किसलेले गूळ, जाडसर वाटलेले ताजे आले आणि हिरवी मिरची, लसूण घ्या. चांगले मिक्स करा.
 2. कोबीचे मिश्रण, मीठ घाला. चांगले मिक्स करून घ्या.
 3. एकावेळी थोडे थोडे पाणी घाला आणि मिश्रण तयार करा. हे थोडे चिकट होईल. कणिक मळतो तसे एकत्र करून घ्या. जर पाणी लागत असेल तरच घाला
 4. हातवर थोडे तेल किंवा पाणी लावून घ्या. मिश्रणाचे दोन लंबकार (४-५ इंच लांब) गोळ्यांमध्ये विभाजन करा.
 5. प्लेट वर थोडेसे तेल पसरवून घ्या आणि बनवलेले लॉग्स त्यावर ठेवा.
 6. स्टीमर किंवा कुकरमध्ये वाफवुन घ्या. (प्रेशर कूकरचा वापर केल्यास, 3 शिट्ट्यासाठी शिजवा आणि स्टीमरमध्ये १८-२० मिनिटे ते शिजवावे. गॅस बंद करा. कुकरच्या दाब सहजपणे खाली येऊ द्या.
 7. थंड होऊ द्या. दीड इंच जाड काप करून घ्या.
 8. एका कढईत तेल गरम करावे. कढीपत्ता पाने घाला. काही सेकंद ढवळा.
 9. जिरे, पांढरे तीळ, घालून त्यांना तडतडू द्या. हिंग घाला. परतून घ्या
 10. कापलेल्या मुठिया किंवा वड्यां घाला आणि गोल्डन ब्राऊन, कुरकुरीत होईपर्यंत तळा.
 11. चहा, कॉफ़ीसह गरम सर्व्ह करा.

My Tip:

जास्त घट्ट गोळे बनवू नका. ते वाफवल्यावर एकदम कडक होतील.

Reviews for Cabbage Muthia Recipe in Marathi (0)