ओट्स रवा डोसा | Oats Rava Dosa Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  25th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Oats Rava Dosa recipe in Marathi,ओट्स रवा डोसा, Sujata Hande-Parab
ओट्स रवा डोसाby Sujata Hande-Parab
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

ओट्स रवा डोसा recipe

ओट्स रवा डोसा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Oats Rava Dosa Recipe in Marathi )

 • ओट्स पीठ - ३/४ कप (ओट्स मिक्सरला लावून त्याचे पीठ करून घेणे.)
 • रवा - १/४ कप
 • तांदळाचे पीठ - ४-५ टेबलस्पून
 • दही - १/४ कप (फेटून घेतलेले)
 • बारीक कापलेली हिरवी मिरची - २ (थोड्या कमी तिखट असणाऱ्या)
 • कोथिंबिरीची पाने बारीक कापून घेतलेली - ४ टेबलस्पून 
 • अद्रक - १ टीस्पून किसून घेतलेले
 • कांदा - १/२ एकदम बारीक चिरून घेतलेला 
 • जिरे-१ टीस्पून 
 • काली मिरी पूड - १ टीस्पून 
 • मीठ चवीनुसार 
 • तेल - १ टेबलस्पून डोसा मिश्रणामध्ये घालण्यासाठी - ३-४ टेबलस्पून डोसा भाजण्यासाठी
 • पाणी - १ १/२ - २ कप किंवा जसे लागेल तसे अतिघट्ट किंवा पातळ मिश्रण नको. 

ओट्स रवा डोसा | How to make Oats Rava Dosa Recipe in Marathi

 1. एका मोठ्या टोपात किंवा वाडग्यात पाणी सोडून सगळे पदार्थ घ्यावेत. चांगले मिक्स करून घ्यावेत.
 2. पाणी हळू हळू टाकून मिश्रण व्यवस्तिथ जास्त घट्ट किंवा अति पातळ नसेल असे करावे. १०-१५ मिनिटे बाजूला झाकून ठेवावे. जेणेकरून रवा थोडासा फुगतो.
 3. एका नॉनस्टिक पॅनला तेल लावून घ्यावे. त्यावर बनवलेले मिश्रण थोडे घालून पाहावे. आच जास्त-माध्यम असावी. मिश्रण टाकताना व्यवस्तिथ तव्यावर पडले पाहिजे आणि त्याला छान जाळी आली पाहिजे तर ते मिश्रण डोसे करण्यायोग्य समजावे.
 4. जर मिश्रण पाहिजे तसे झाले असेल तर एका खोलगट चमच्याने ते व्यवस्तिथ गोलाकार तापलेल्या तव्यावर किंवा पॅन वर टाकावे. १०-१५ सेकंदासाठी झाकण ठेवावे.
 5. झाकण काढून थोडा वेळ भाजू द्यावे.
 6. जेव्ह डोशाच्या बाजू सुटू लागतील त्या वेळेस तो परतून घ्यावा. दुसऱ्या बाजूने हि व्यवस्तिथ ब्राउन आणि थोडा कुरकुरीत होईपर्यंत भाजावा.
 7. चटणी बटोबार सर्व्ह करावा किंवा टिफिन मध्ये भरून द्यावा.

My Tip:

चुकून जास्त पाणी पडल्यास तांदळाचे पीठ आणि थोडा रवा घालावा.

Reviews for Oats Rava Dosa Recipe in Marathi (0)