नाचणीचे झटपट डोसे | Instant Raagi Dosa Recipe in Marathi

प्रेषक Sanika SN  |  26th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Instant Raagi Dosa recipe in Marathi,नाचणीचे झटपट डोसे, Sanika SN
नाचणीचे झटपट डोसेby Sanika SN
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

About Instant Raagi Dosa Recipe in Marathi

नाचणीचे झटपट डोसे recipe

नाचणीचे झटपट डोसे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Instant Raagi Dosa Recipe in Marathi )

 • १ वाटी नाचणीचे पीठ
 • १/२ वाटी तांदळाची पिठी
 • १ हिरवी मिरची बारीक चिरून
 • ५-६ कढीपत्ता बारीक चिरून
 • बारीक चिरलेली कोथींबीर
 • मीठ चवीनुसार

नाचणीचे झटपट डोसे | How to make Instant Raagi Dosa Recipe in Marathi

 1. नाचणीचे पीठ, तांदळाची पिठी, चिरलेली मिरची, चिरलेली कोथींबीर, चिरलेला कढीपत्ता व मीठ एकत्र करावे.
 2. त्यात थोडे-थोडे करून पाणी घालून घावने / नीर डोश्याप्रामाणे पातळ मिश्रण बनवावे. (ताकात भिजवले तरी चालेल)
 3. नॉन-स्टीक तवा गरम करायला ठेवावा व डावाने मिश्रण तव्यावर ओतावे.(घावनाप्रमाणे मिश्रण ओतावे, नेहमीच्या डोश्याप्रमाणे वाटीने पसरवायचे नाही.)
 4. थोडे तेल सोडून हलकेच काढावे.
 5. गरम-गरम डोसे नारळाच्या, लसणीच्या चटणीबरोबर किंवा लोणच्याबरोबर सर्व्ह करावे.

Reviews for Instant Raagi Dosa Recipe in Marathi (0)