उरलेल्या भाताचे टेस्टी वडे | Left over Rice Puris Recipe in Marathi

प्रेषक Shraddha Juwatkar  |  27th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Left over Rice Puris recipe in Marathi,उरलेल्या भाताचे टेस्टी वडे, Shraddha Juwatkar
उरलेल्या भाताचे टेस्टी वडेby Shraddha Juwatkar
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

2

0

About Left over Rice Puris Recipe in Marathi

उरलेल्या भाताचे टेस्टी वडे recipe

उरलेल्या भाताचे टेस्टी वडे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Left over Rice Puris Recipe in Marathi )

 • 1 वाटी रात्रीचा उरलेला भात
 • 1 वाटी कणीक
 • 1 वाटी बारीक चिरलेला कांदा
 • मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर
 • 1 चमचा लाल तिखट, धणे पावडर, थोडीशी हळद व मीठ चवीनुसार
 • 1 चमचा तीळ
 • तेल
 • पाणी

उरलेल्या भाताचे टेस्टी वडे | How to make Left over Rice Puris Recipe in Marathi

 1. प्रथम भात चांगला मऊ करून घेणे
 2. आता त्यात कणीक, चिरलेला कांदा, हळद व लाल तिखट, धणे पावडर, मीठ, कोथिंबीर, तीळ घालून व्यवस्थित एकत्रित करून घेणे व लागेल तेवढे पाणी घालून चांगले मळून घेणे.
 3. कढईत तेल गरम करत ठेवावे व प्लास्टीकच्या पिशवी वर तेलाचा हात लावून गोल आकारात एकसारखे वडे थापावे
 4. गरम तेलात वडे सोनेरी रंगावर तळून घ्यावेत व साॅस बरोबर टिफिन मध्ये पॅक करावे.

Reviews for Left over Rice Puris Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo