मुख्यपृष्ठ / पाककृती / डोनट्स

Photo of Donuts by seema Nadkarni at BetterButter
0
2
0(0)
0

डोनट्स

Jul-28-2018
seema Nadkarni
59 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डोनट्स कृती बद्दल

हा पदार्थ सगळ्या मुलांना आवडणारा आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • बेकिंग
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. 1/2 कप मैदा
  2. 1/2 कप गव्हाचे पीठ
  3. 1/2 टी स्पून मीठ
  4. 1 चमचा यीस्ट
  5. 2 चमचा साखर
  6. 1/2 कप दूध
  7. 2-3 चमचा बटर किंवा तेल
  8. 2 चमचा मिल्क पावडर
  9. 1/4 टि स्पून बेकिंग पावडर
  10. तळण्यासाठी तेल
  11. कोको पावडर 4 चमचा
  12. 2-3 चमचा दूध
  13. 2 चमचा साखर
  14. 1 चमचा बटर
  15. डेकोरेशन साठी गोळ्या बारीक

सूचना

  1. 1/2 कप दूध कोमट करून घ्या, त्यात 2 चमचा साखर आणि यीस्ट टाकून एकत्र करून 10 मिनिटे बाजूला ठेवावे. फरमेन्ट व्हायला.
  2. एका भांड्यात मैदा आणि गव्हाचे पीठ एकत्र त्यात मीठ, बेकिंग पावडर, मिल्क पावडर घालून घ्या.
  3. यीस्ट फरमेन्ट झाले कि ते वरील पीठा च्या मिश्रणात घालून पीठ मळून घ्यावे.
  4. हे पीठ थोडे चीकट होईल, पीठा ला तेलाचा हात लावून प्लेटफोम वर चांगले 10 - 15 मिनिटे मळून घ्या.
  5. मळून घेतल्या वर चीकट पणा राहणार नाही. ह्या पीठा च्या गोळ्या ला तेलाचा हात लावून बाऊल मध्ये ठेवून दिड तास गरम जागेवर झाकून ठेवावे
  6. दिड तास नी हे पीठ डबल फूगून जाईल.
  7. ह्या पीठा ची थोडे थोडे दाबून घ्यावे.
  8. किचन प्लेटफोम वर मैदा लावून पोळी सारखे लाटून घ्या. त्याचे डोनट्स च्या आकाराचे कापून एका ताटात ठेवून. :doughnut:
  9. 15-20 मिनिटे झाकून ठेवावे. की ते डबल होतील.
  10. तेल गरम करुन त्यात हे डोनट्स तळून घ्या. किंवा बेकिंग ट्रे मध्ये ठेवून बेक करून घ्या.
  11. डोनट्स थंड होतील तो पर्यंत चोकलेट सोँस तयार करून घ्या
  12. कोको पावडर मध्ये पीठी साखर मिक्स करून घ्या. त्यात थोडे बटर टाकून कोमट दूध घालून एकत्र करून घ्यावे.
  13. या मिश्रणात तयार केलेले डोनट्स बुडवून त्या वर डेकोरेशन साठी छोट्या छोट्या गोळ्या लावून फ्रिज मध्ये 5 मिनिटे ठेवून. मगच सर्व करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर