BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / पालक पिठलं व बाजरीची भाकरी

Photo of Palak pithle va bajrichi bhakari by Aarti Nijapkar at BetterButter
0
5
0(0)
0

पालक पिठलं व बाजरीची भाकरी

Jul-29-2018
Aarti Nijapkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पालक पिठलं व बाजरीची भाकरी कृती बद्दल

लंच साठी उत्तम असा हा बेत आहे शिवाय पौष्टीक आहेच

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. पालक पिठलं
  2. पालक धुवून बारीक चिरलेली १/४ कप
  3. बेसन १/४ कप
  4. आलं लसूण , जिरे , मिरची पेस्ट १ मोठा चमचा
  5. कोथिंबीर १ मोठा चमचा
  6. मीठ स्वादानुसार
  7. हळद १/२ मोठा चमचा
  8. बाजरीची भाखरी
  9. बाजरीचे पीठ १ कप
  10. किंचित मीठ
  11. गरम पाणी पीठ मळण्यासाठी

सूचना

  1. पालक पिठलं
  2. कढईत तेल घाला त्यात आलं लसूण जिरं मिरचीची पेस्ट घालून परतवून घ्या
  3. स्वादानुसार मीठ व हळद घाला
  4. आता चिरलेली पालक घाला व परतवून घ्या
  5. बेसन घाला व मसाल्यांसोबत खरपूस भाजून घ्या
  6. आता गरम पाणी घाला व सतत ढवळत राहा म्हणजे गुठळ्या होणार नाही
  7. गॅस मंद करून पिठलं शिजवून घ्या
  8. ४ ते ५ मिनिटे वाफवून घ्या
  9. पालक पिठलं तयार आहे
  10. बाजरीची भाकरी
  11. पाणी गरम करून बाजरीच्या पिठात हवं तेवढे घालून पीठ चांगलं मळून घ्या
  12. गॅस वर तवा तापवत ठेवा
  13. आता पीठ परातीत गोलाकार थापून घ्या
  14. गरम तव्यावर अलगद ठेवून वर पाण्याचा हात लावून घ्या
  15. पाणी सुकले की भाकरी पालटून घ्या
  16. आता भाकरी व्यवस्थित भाजून घ्या
  17. भाकरी ही फुगलीच पाहिजे तर त्याची खाण्यात मज्जा आहे
  18. भाकरी आणि पालक पिठलं तयार आहे
  19. सोबत कोकमचं पाणी , ताक , मसाला कैरी ,कांदा हिरवी मिरची असे वाढा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर