स्ट्रॉबेरीचे श्रीखंड | Strawberry Shrikhand Recipe in Marathi

प्रेषक Shraddha Juwatkar  |  30th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Strawberry Shrikhand recipe in Marathi,स्ट्रॉबेरीचे श्रीखंड, Shraddha Juwatkar
स्ट्रॉबेरीचे श्रीखंडby Shraddha Juwatkar
 • तयारी साठी वेळ

  3

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

स्ट्रॉबेरीचे श्रीखंड recipe

स्ट्रॉबेरीचे श्रीखंड बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Strawberry Shrikhand Recipe in Marathi )

 • अर्धा किलो दही
 • 8/10 स्ट्रॉबेरी
 • अर्धी वाटी पिठी साखर
 • 1 टेबलस्पून साखर

स्ट्रॉबेरीचे श्रीखंड | How to make Strawberry Shrikhand Recipe in Marathi

 1. स्ट्रॉबेरीज स्वछ धूवून कपड्याने पुसून बारीक कापून घेणे
 2. एक पॅन गरम करून त्यात स्ट्रॉबेरीज व 1 टेबलस्पून साखर घालून चांगले स्ट्रॉबेरीज नरम होईपर्यंत परतून घ्यावे.
 3. गॅस बंद करून मिश्रण थंड होण्यासाठी ठेवावे
 4. दही एका काॅटनचया कपड्यात गाठ बांधून 3 तास टांगून ठेवावे.मध्ये मध्ये कपड्यावर दाबून पाणी बाहेर काढावे. चक्का तयार होतो
 5. एका बाऊल मध्ये चक्का घालून त्यात पिठी साखर घालावी व चांगले एकजीव फेटून घ्यावे व स्ट्रॉबेरीजचे मिश्रण घालून हलक्या हाताने ढवळून फ्रीज मध्ये थंड करण्यास ठेवावे. गारेगार सर्व्ह करावे

Reviews for Strawberry Shrikhand Recipe in Marathi (0)