बिटाची वडी | Beet Burfi Recipe in Marathi

प्रेषक Shraddha Juwatkar  |  31st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Beet Burfi recipe in Marathi,बिटाची वडी, Shraddha Juwatkar
बिटाची वडीby Shraddha Juwatkar
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

About Beet Burfi Recipe in Marathi

बिटाची वडी recipe

बिटाची वडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Beet Burfi Recipe in Marathi )

 • १ कप उकडून किसलेला बीट
 • १/ २ कप साखर
 • १/ २ कप खवलेला ताजा नारळ
 • १ टीस्पून वेलची पुड
 • २ टेबलस्पून तूप

बिटाची वडी | How to make Beet Burfi Recipe in Marathi

 1. बीट प्रेशर कुकरमध्ये पाणी न घालता फक्त १ ते २ शिट्ट्या करून उकडून घ्यावा. गार झाल्यावर साल काढून टाकावे. किसणीवर किसून घ्यावे.
 2. पॅनमध्ये तूप गरम करावे. त्यात साखर, नारळ आणि किसलेले बीट एकत्र करून मिडीयम-हायच्या मध्ये गॅस ठेवावा.
 3. सारखे ढवळत राहून आटवावे. मिश्रण आधी एकदम पातळ होईल मग हळूहळू घट्टसर होईल. संपूर्ण साधारण दहा मिनिटे लागतील
 4. स्टीलच्या ताटाला मागच्या बाजूला तूप लावून ठेवावे. 
 5. मिश्रण तयार होत आले की वेलची पूड घालावी. मिश्रण ताटावर घालून थापावे. सुरीला तूप लावून सुरीने चौकोनी आकारात काप करून घ्यावे

Reviews for Beet Burfi Recipe in Marathi (0)