राजगिरा पिठाची नानकटाई | Rajgira flour Nankatai Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  3rd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Rajgira flour Nankatai recipe in Marathi,राजगिरा पिठाची नानकटाई, Archana Chaudhari
राजगिरा पिठाची नानकटाईby Archana Chaudhari
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

15

0

राजगिरा पिठाची नानकटाई recipe

राजगिरा पिठाची नानकटाई बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Rajgira flour Nankatai Recipe in Marathi )

 • राजगिऱ्याचे पीठ १/२ कप
 • बदाम पावडर १/२ कप
 • पिठीसाखर २ टेबलस्पून
 • गार लोणी २ टेबलस्पून(मीठ नसलेले, घरचे असेल तर छानच)
 • सोडा १/२ टीस्पून
 • मीठ १ चिमूटभर

राजगिरा पिठाची नानकटाई | How to make Rajgira flour Nankatai Recipe in Marathi

 1. एका भांड्यात लोणी आणि पिठीसाखर फेसून घ्या.
 2. फेसलेल्या मिश्रणात राजगिऱ्याचे पीठ आणि बदाम पावडर,सोडा टाकून छान एकत्र करुन घ्या.
 3. तयार झालेला गोळा एका क्लिंग फिल्म मध्ये गुंडाळून फ्रिजमध्ये १० मिनिटे ठेवा.
 4. आता फ्रिजमधून काढलेल्या गोळ्यांचे समान भाग करून घ्या.
 5. एका ताटामध्ये बटर पेपर लावून ठेवा.
 6. आता समान भाग केलेल्या गोळ्यांचे गोल गोल करून,अंगठयाने हलकेच मधे दाबा.
 7. तयार गोल बटर पेपर वर ठेवा.
 8. ओव्हन १८० अंश सेंटिग्रेड ला तापत ठेवा.
 9. आता वरील गोळ्यांचे ताट ओव्हनच्या रॅक वॉर ठेऊन १८० अंश सेंटिग्रेड ला १५ मिनिटे बेक करा.
 10. मध्ये मध्ये बघत रहा...
 11. १५ मिनिटे झाल्यावर राजगिऱ्याच्या नानकटाई गर झाल्यावर एका हवाबंद डब्यात भरून ठेवा.
 12. पौष्टिक नानकटाई तयार आहे.

My Tip:

तुम्ही वेलची पावडर टाकू शकता.

Reviews for Rajgira flour Nankatai Recipe in Marathi (0)