अळीवाचे लाडू | Halim Ladoos Recipe in Marathi

प्रेषक Shraddha Juwatkar  |  3rd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Halim Ladoos recipe in Marathi,अळीवाचे लाडू, Shraddha Juwatkar
अळीवाचे लाडूby Shraddha Juwatkar
 • तयारी साठी वेळ

  4

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

अळीवाचे लाडू recipe

अळीवाचे लाडू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Halim Ladoos Recipe in Marathi )

 • अळीव १ वाटी
 • चिरलेला गूळ १.५ ते २ वाट्या
 • ताजा खवलेला नारळ २ वाट्या
 • नारळाचे पाणी १/२ वाटी
 • वेलची पूड १/२ चमचा
 • तूप १ मोठा चमचा
 • सुका मेवा आवडीनुसार

अळीवाचे लाडू | How to make Halim Ladoos Recipe in Marathi

 1. अळिवात साफ करून त्यात खवलेला नारळ, नारळाचे पाणी आणि गूळ घालून एकत्र करा आणि ३-४ तास झाकून ठेवा
 2. एका जाड बुडाच्या भांड्यात तूप घालून अळिवाचे मिश्रण बारीक गॅस वर शिजवा. एक सारखे ढवळत रहा म्हणजे पातेल्याला चिकटणार नाही
 3. मिश्रण सुकले की त्यात वेलची पावडर, सुका मेवा घालून मिश्रण एकत्र करा व गॅस बंद करा.
 4. मिश्रण कोमट असताना लाडू वळा.

My Tip:

हे लाडू ३-४ दिवसासाठी ठेवायचे असतील तर फ्रिज मध्ये ठेवावे लागतात.

Reviews for Halim Ladoos Recipe in Marathi (0)