मुख्यपृष्ठ / पाककृती / अळीवाचे लाडू

Photo of Halim Ladoos by Shraddha Juwatkar at BetterButter
829
3
0.0(0)
0

अळीवाचे लाडू

Aug-03-2018
Shraddha Juwatkar
240 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अळीवाचे लाडू कृती बद्दल

अळिवाचे लाडू फक्त बाळंतिणीनंच खावे असं नाही. अळीव खूप पौष्टिक असतात आपल्या आहारात त्याचा नक्की समावेश करावा

रेसपी टैग

  • नवरात्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. अळीव १ वाटी
  2. चिरलेला गूळ १.५ ते २ वाट्या
  3. ताजा खवलेला नारळ २ वाट्या
  4. नारळाचे पाणी १/२ वाटी
  5. वेलची पूड १/२ चमचा
  6. तूप १ मोठा चमचा
  7. सुका मेवा आवडीनुसार

सूचना

  1. अळिवात साफ करून त्यात खवलेला नारळ, नारळाचे पाणी आणि गूळ घालून एकत्र करा आणि ३-४ तास झाकून ठेवा
  2. एका जाड बुडाच्या भांड्यात तूप घालून अळिवाचे मिश्रण बारीक गॅस वर शिजवा. एक सारखे ढवळत रहा म्हणजे पातेल्याला चिकटणार नाही
  3. मिश्रण सुकले की त्यात वेलची पावडर, सुका मेवा घालून मिश्रण एकत्र करा व गॅस बंद करा.
  4. मिश्रण कोमट असताना लाडू वळा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर